Exclusive : युतीवर मुख्यमंत्री ठाम, स्वबळाचा नारा देणाऱ्यांना लगाम!, कसे आहे भाजपचे विभागीय कार्यालय जाणून घेऊ जागेपासून सुविधांपर्यंत अन्‌ मालकीपासून सुरक्षेपर्यंत...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : नगरपालिका निवडणुकांत कुठे, कोणते पक्ष सोबत राहणार, कोणते पक्ष विरोधात लढणार हे अद्याप स्‍पष्ट नाही. बहुतांश ठिकाण शिंदे गटाने स्वबळाचा नारा दिला आहे, तर कुठे भाजप स्वबळावर निवडणूक लढण्याच्या प्रयत्नात आहे. अशा स्थितीत मित्रपक्षांत बिनसू नये, याची काळजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याने रविवारी (१६ नोव्‍हेंबर) दिसून आले. जेथे जेथे शक्य आहे, तेथे महायुती करायची आहे. एखाद्या ठिकाणी युती झाली नाही तरी आपल्यासमोर लढणारे पक्ष मित्र पक्ष आहेत, विरोधक नाहीत, हे लक्षात ठेवूनच लढायचे आहे, अशी सूचना फडणवीस यांनी केली.

581513131_1407526744068795_25423 (1)

चिकलठाणा विमानतळासमोर भाजपचे भव्यदिव्य विभागीय कार्यालय उभारले असून, त्याचे उद्‌घाटन रविवारी (१६ नोव्हेंबर) मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. खा. डॉ. भागवत कराड, मंत्री अतुल सावे, पंकजा मुंडे, मेघना बोर्डीकर, माजी खासदार रावसाहेब दानवे, केंद्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर, आ. संजय केणेकर, नारायण कुचे, सुरेश धस, बबनराव लोणीकर, प्रशांत बंब, किशोर शितोळे, शिरीष बोराळकर आदींची उपस्थिती होती. या वेळी फडणवीस म्हणाले, की विरोधक कधी मतचोरीचा मुद्दा, कथी ईव्हीएमचा मुद्दा आणतात. पण ज्यावेळी कोर्ट त्यांना पुरावा मागते, इलेक्शन कमिशन पुरावा मागते. तेव्हा एक पुरावाही देऊ शकत नाहीत. ते हवेत गोळीबार करतात. असेच वागत राहिले, तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही त्यांची माती होईल. हे माझे भाकित आहे, असे ते म्हणाले.

582838963_1407527154068754_36675 (1)

असे आहे कार्यालय...
-कार्यालय २० हजार चौरस फूट जागेवर ४० हजार चौरस फूट बांधकाम
-एकाच वेळी दोन मजल्यांवर एक हजार कार्यकर्त्यांची बैठक व्यवस्था
-मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांसाठी सुसज्ज केबिन
-सीसीटीव्ही यंत्रणा, वॉर रूम, २५० माध्यम प्रतिनिधी बसू शकतील एवढा मोठा हॉल
-१३ व्यक्तींच्या क्षमतेची लिफ्ट यंत्रणा, अतिमहत्त्वाच्या नेत्यांसाठी स्वतंत्र लिफ्ट
-अंडरग्राउंड वाहनतळाची उभारणी करण्यात आली आहे
-ग्रीन एनर्जीला प्राधान्य, २२६ सौपॅनलच्या माध्यमातून प्रतिदिन पाचशे ते सहाशे युनिट वीजनिर्मिती
-कार्यालयाची मालकी भाजप प्रदेश नावाचा ट्रस्ट असून त्याच्या नावाने रजिस्ट्री व इतर परवानग्या.
-कुठल्याही शासकीय योजनेतून जागा नाही, शहा नावाच्या नाशिक येथील व्यक्तीकडून जागा खरेदी, विविध शासकीय परवानग्या घेतल्या, कुठेही अनधिकृत काम नाही.
-चार वर्षांपूर्वी सात ते आठ कोटींमध्ये जागा घेतलेली आहे. सुमारे १२ ते १४ कोटींत इमारत उभी केल्याचे सांगण्यात येते.

581480514_1407527227402080_54588 (1)

ते सगळे तोंडघशी पडतील...
पुणे ते छत्रपती संभाजीनगर द्रुतगती मार्ग मॅप सोशल मीडियात व्हायरल करणारे सगळे तोंडघशी पडतील, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळावर पत्रकारांशी बोलताना केल्याने खळबळ उडाली आहे. तीन वर्षापूर्वीचे अलायन्मेंट असून, अंतिम मॅप अजून तयार व्हायचा आहे, असे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, की सध्याच्या रस्ता दुरुस्तीसाठी एनएचएआयशी बोलणे झाले असून, ते रस्ता दुरुस्त करणार आहेत.
युतीबद्दल काय म्हणाले...
काही ठिकाणी युती झाली तर काही ठिकाणी जागावाटपाची चर्चा केली जात आहे. जिल्ह्यात सोयीनुसार निर्णय होत आहेत. नगरपालिकेच्या निवडणुका छोट्या असतात. मनपा निवडणुकीत वेगळे निकष आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट

Latest News

समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहराजवळील गांधेली येथे मंगळवारी (१० मार्च) रात्री ९ च्या सुमारास हभप निवृत्ती...
सोशल मीडियातून ओळख, प्रेम, ४ महिने सहवास, नंतर जातीवरून युवतीला लाथाबुक्क्या!; प्रियकरासह त्याची आई, दोन बहिणी, भावाविरुद्ध ‘ॲट्रॉसिटी’, पाचोडची घटना
भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना
नापिकी, कर्जबाजारीपणाचे आणखी २ बळी!; सिल्लोड, कन्नड तालुक्यातील २ शेतकऱ्यांनी कवटाळले मरण!!
फीट येऊन चुलीवर पडल्याने महिलेचा मृत्यू, सातारा परिसरातील संत ज्ञानेश्वरनगरातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software