- News
- पॉलिटिक्स
- सावेंच्या ‘फिफ्टी-फिफ्टी’च्या भूमिकेमुळे भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांत नाराजी!; केणेकर म्हणाले, विर...
सावेंच्या ‘फिफ्टी-फिफ्टी’च्या भूमिकेमुळे भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांत नाराजी!; केणेकर म्हणाले, विरोधकांना आयते उमेदवार द्यायचे का?
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महापालिका निवडणुकीत जागा वाटपावरून महायुतीच्या शिंदे गट आणि भाजपमध्ये ताणाताणी वाढण्याची शक्यता आहे. मंत्री अतुल सावे यांनी ‘फिफ्टी-फिफ्टी'चा फॉर्म्युला अवलंबला तरच युती होऊ शकते, असे स्पष्ट केल्यानंतर भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांत नाराजीचा सूर उमटला. हा फार्म्युला कोणत्या आधारावर आणला जात आहे?, असा सवाल करत आ. संजय केणेकर यांनी भाजपलाच जास्त जागा मिळायला पाहिजेत, अशी भूमिका मांडली. ‘फिफ्टी-फिफ्टी'च्या फॉर्म्युल्यामुळे विरोधकांना आयते उमेदवार द्यायचे का, असे केणेकर म्हणाले. त्यामुळे शिंदे गटात चलबिचलता वाढली आहे.
शिंदे गटाने महायुती करण्यासाठी २०१५ चा फॉर्म्यूला पुढे केला आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेची शेवटची निवडणूक २०१५ मध्ये झाली होती, त्यावेळी शिवसेनेचे (अविभाजित) २९ नगरसेवक निवडून आले होते, तर ९ नगरसेवकांनी नंतर शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे ३८ जागांवर शिंदे गटाने दावा केला आहे. आताच्या परिस्थितीत राज्यात आणि शहरात भाजप अधिक मजबूत आहे, तर शिवसेनेचे दोन गट झालेले आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपचे २३ नगरसेवक होते, तेवढ्या जागा भाजपला आणि उरलेल्या जागांचे समान वाटप, अशी भूमिका शिंदे गटाने घेतली आहे. त्यात आता सावेंनी ‘फिफ्टी-फिफ्टी'च्या फॉर्म्युला ठेवला आहे. त्यामुळे शिंदे गटाला काहीअंशी दिलासा मिळाला असला तरी, भाजपमध्ये मात्र नाराजी पसरली आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
विहिरीत पडून १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू, पिशोर येथील दुर्दैवी घटना
By City News Desk
महापालिका स्थायी समिती सभापतिपदी अनिल मकरिये, आज औपचारिक निवड
By City News Desk
हरिभाऊ बागडे यांच्या प्रकृतीत सुधारणा!; रुग्णालयातून डिस्चार्ज
By City News Desk
Latest News
12 Mar 2026 20:36:06
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहराजवळील गांधेली येथे मंगळवारी (१० मार्च) रात्री ९ च्या सुमारास हभप निवृत्ती...

