- News
- पॉलिटिक्स
- पुन्हा दानवे-शिरसाट भिडले : मुलीसाठी पालकमंत्र्यांकडून मतदार यादीत घोळ!; अंबादास दानवे यांच्या आरोपा...
पुन्हा दानवे-शिरसाट भिडले : मुलीसाठी पालकमंत्र्यांकडून मतदार यादीत घोळ!; अंबादास दानवे यांच्या आरोपाने खळबळ, मंत्री शिरसाट म्हणाले, दानवेंना बेछूट आरोप करण्याची सवयच!!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही राजकीय नेत्यांच्या मुला- मुलींसाठी मतदारयाद्यांमध्ये घोळ घालण्यात येत आहे. १ जुलै २०२५ रोजी मतदारयाद्या अंतिम झाल्या असताना पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या मुलीचे नाव यादीत टाकण्यासाठी २७ ऑक्टोबरला अर्ज करण्यात आला. बीएलओने राजकीय दबावाखाली हे नाव समाविष्टही केले, असा आरोप माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गुरुवारी (१३ नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेऊन केला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे तक्रार केल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, या आरोपावर मंत्री शिरसाट यांनी उत्तर दिले असून, दानवे यांना कायम बेछूट आरोप करण्याची सवयच लागली असल्याचे शिरसाट म्हणाले.
पत्रकार परिषद घेऊन अंबादास दानवे म्हणाले, की निवडणूक आयोग थोतांड आहे. शिरसाट यांच्या मुलीचा अर्ज माझ्याकडे आहे. मी जिल्हाधिकाऱ्यांना हे सांगितल्यावर त्यांनी तपास करतो, असे म्हटले आहे. एका व्यक्तीनेही याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यात नियमांचे उल्लंघन करून नाव घालण्यात आल्याचा आरोप केला आहे. १ जुलै २०२५ पर्यंत नोंदणी झालेल्यांनाच मतदान आणि निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. आयोगाने तसे प्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर केले आहे. तरीही २६ ऑक्टोबरला नाव नोंदवले गेले, असे दानवे म्हणाले.
कोरेगाव पार्क येथील चाळीस एकर जमीन घोटाळा प्रकरणात पार्थ पवारवर गुन्हा दाखल व्हायला हवा होता. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना वाचवत आहेत, असा आरोपही दानवे यांनी या वेळी केला. वर्षा बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात वाद झाला. पार्थवर गुन्हा दाखल झाला तर आपण सरकारमधून बाहेर पडू, असा इशारा अजित पवार यांनी दिल्याची माझी माहिती आहे. उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा म्हणून वागणूक न देता त्यांना संशयित गुन्हेगार म्हणूनच वागवले पाहिजे, असे दानवे म्हणाले.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
विहिरीत पडून १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू, पिशोर येथील दुर्दैवी घटना
By City News Desk
महापालिका स्थायी समिती सभापतिपदी अनिल मकरिये, आज औपचारिक निवड
By City News Desk
हरिभाऊ बागडे यांच्या प्रकृतीत सुधारणा!; रुग्णालयातून डिस्चार्ज
By City News Desk
Latest News
12 Mar 2026 20:36:06
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहराजवळील गांधेली येथे मंगळवारी (१० मार्च) रात्री ९ च्या सुमारास हभप निवृत्ती...

