अंबादास दानवे यांच्या जिवाला धोका?

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शिवसेना नेते तथा माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते आ. अंबादास दानवे यांच्या जिवाला धोका असून, त्यांची सुरक्षा वाढविण्यात यावी, अशी मागणी ठाकरे गटाने पोलीस आयुक्‍त प्रवीण पवार यांच्याकडे गुरुवारी (११ डिसेंबर) निवेदनाद्वारे केली आहे. त्यांना विविध माध्यमांतून धमक्या मिळत असल्याचे म्हटले आहे.

निवेदनात नमूद केले की, दानवे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये नोटांचे बंडल मोजताना एक व्यक्ती दिसून येते. ही व्यक्ती कोण, व्हिडीओतील नोटांचा स्‍त्रोत काय, हे पैसे कोणाचे, याबाबत पोलीस यंत्रणेमार्फत तातडीने सखोल चौकशी करावी, अशी मागणीही निवेदनात केली आहे. रायगड जिल्ह्यात एका नेत्याच्या समर्थकांनी अंबादास दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला आग लावण्याची घटना घडली. या व्यक्तींची ओळख पटवून तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

597170486_1388532889953184_18149 (1)
पोलीस आयुक्‍तांना निवेदन देताना ठाकरे गटाचे शिष्टमंडळ.

दानवे यांना मिळत असलेल्या सर्व धमक्यांची यंत्रणात्मक पडताळणी करावी. त्यांची व्यक्तिगत सुरक्षा, निवासस्थानी सुरक्षा व दौऱ्यावेळी सुरक्षा तातडीने वाढवावी. धमक्या देणाऱ्यांची ओळख पटवून त्यांच्यावर त्वरित गुन्हे नोंदवावेत. अंबादास दानवे यांच्या जीविताला धोका झाल्यास त्यास महाराष्ट्र शासन व गृह विभाग पूर्णपणे जबाबदार राहील, असा गंभीर इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर महानगरप्रमुख राजू वैद्य, उपजिल्हाप्रमुख संतोष खेंडके, विजय वाघमारे, शहरप्रमुख हरिभाऊ हिवाळे, दिग्विजय शेरखाने, उपशहरप्रमुख राजेंद्र दानवे, प्रमोद ठेंगडे, रवी गायकवाड, दिनेशराजे भोसले, गिरीश चपळगावकर, नंदू लबडे, बाबासाहेब पैठणे, कान्हुलाल चक्रनारायण, महिला आघाडी महानगरसंघटक सुकन्या भोसले, शहर संघटक ॲड. सुनीता औताडे, माजी नगरसेविका मनीषा लोखंडे, युवासेना विभागीय सचिव धर्मराज दानवे व हरीश पाटील उपस्थित होते. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरातून ५ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाने खळबळ

Latest News

छत्रपती संभाजीनगरातून ५ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाने खळबळ छत्रपती संभाजीनगरातून ५ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाने खळबळ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्ह्यातून ५ अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरातील ३...
प्रवासी म्हणून बसवले, दुसरीकडेच रिक्षा नेत विद्यार्थ्याला लुटले!; मुकुंदवाडीतील घटना
गव्हाबरोबर गांजा वाढवला... पोलिसांचा शेतात छापा, ५ लाखांचा गांजा जप्त, शेतकऱ्याला अटक, करमाडजवळील कारवाई
वाळूज MIDC तील कमळापुरात दोन गटांत सशस्त्र हाणामारी; ४ गंभीर जखमी, वरिष्ठ पोलिसांचा फौजफाटा घटनास्‍थळी, परिस्थितीवर नियंत्रण (व्हिडीओसह)
१९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software