- News
- पॉलिटिक्स
- सरकारच्या नाकात दम करणाऱ्या मराठा आंदोलक राजश्री उंबरे यांचे १४ व्या दिवशी उपोषण मागे; सरकारला २ आठव...
सरकारच्या नाकात दम करणाऱ्या मराठा आंदोलक राजश्री उंबरे यांचे १४ व्या दिवशी उपोषण मागे; सरकारला २ आठवड्यांची मुदत, आज मध्यरात्रीपासून मनोज जरांगे उपसणार उपोषणास्त्र
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते आणि पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत मराठा आंदोलक राजश्री उंबरे यांनी रविवारी (१५ सप्टेंबर) रात्री १४ व्या दिवशी सरबत पिऊन उपोषण सोडले. मराठवाड्यातील मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी सरकारला दोन आठवड्यांची मुदत उंबरे यांनी सरकारला दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तुमच्याच समाजाचे आहेत. […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते आणि पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत मराठा आंदोलक राजश्री उंबरे यांनी रविवारी (१५ सप्टेंबर) रात्री १४ व्या दिवशी सरबत पिऊन उपोषण सोडले. मराठवाड्यातील मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी सरकारला दोन आठवड्यांची मुदत उंबरे यांनी सरकारला दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तुमच्याच समाजाचे आहेत. शेवट नक्की गोड होईल, असे मंत्री केसरकर म्हणाले. मुख्यमंत्रीपद संवैधानिक पद असल्याने ते राज्यातील नागरिकांचे प्रतिनिधीत्व करतात. केसरकरांच्या वक्तव्याने या पदालाच जातीत विभागले गेल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
गेले १४ दिवस सरकारच्या नाकात दम करणाऱ्या राजश्री उंबरे यांचे उपोषण सोडविण्यात सरकारला यश आले असले तरी, आता मनोज जरांगे आंदोलनाला सज्ज झाले आहेत. ते आज, १६ सप्टेंबरच्या मध्यरात्री १२ पासून बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. राजश्री उंबरे यांच्या उपोषणाला मिळालेला मराठा बांधवांचा प्रतिसाद आणि त्यामुळे प्रशासनाची झालेली धावपळ आणि लगेचच मनोज जरांगे यांचे उपोषण यामुळे सरकारला थोडीही उसंत मिळत नसल्याचे चित्र आहे. जरांगे यांनी आजपर्यंत ५ उपोषण केले असून, त्यांचे हे सहावे उपोषण असेल.0
भुमरेंची जरांगेंशी भेट…
छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदिपान भुमरे यांनी अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे यांची रविवारी दुपारी भेट घेतली. यावेळी दोघांत अडीच तास चर्चा झाली. जरांगे यांनी भुमरेंवर टीका केली होती. त्यानंतर भुमरे लगबगीने जरांगे यांच्या भेटीला गेले. समाजाच्या हितावर आमची चर्चा झाल्याचे भुमरे म्हणाले. चर्चेचा तपशील मात्र समोर आणण्यात आला नाही.

