मराठा आरक्षण : १० दिवसांत सरकार ब्रेकिंग न्‍यूज देणार, मंत्री सत्तार यांचा छत्रपती संभाजीनगरात दावा, म्हणाले, मनोज जरांगे मामुली चीज नाही…

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मराठा आरक्षण आंदोलन नेते मनोज जरांगे यांच्या मागणीबाबत राज्य सरकार गंभीर असून, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्रितपणे १० दिवसांत त्यावर निर्णय घेऊन ब्रेकींग न्यूज देणार आहेत. ओबीसी बांधवांवर अन्याय होऊ न देता कायद्याच्या चौकटीत बसवून मराठा बांधवांना न्याय दिला जाईल, असे महत्त्वपूर्ण माहिती राज्याचे अल्पसंख्याक, वक्फ, पणन मंत्री अब्दुल सत्तार […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मराठा आरक्षण आंदोलन नेते मनोज जरांगे यांच्या मागणीबाबत राज्य सरकार गंभीर असून, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्रितपणे १० दिवसांत त्यावर निर्णय घेऊन ब्रेकींग न्यूज देणार आहेत. ओबीसी बांधवांवर अन्याय होऊ न देता कायद्याच्या चौकटीत बसवून मराठा बांधवांना न्याय दिला जाईल, असे महत्त्वपूर्ण माहिती राज्याचे अल्पसंख्याक, वक्फ, पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी शनिवारी (२९ जून) छत्रपती संभाजीनगरात पत्रकारांना दिली.

जिल्हा बँकेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री सत्तार बोलत होते. हे सरकार हिंदुत्ववादी असूनही मुस्लीम समाजाच्या अनेक गोष्टींसाठी आर्थिक तरतूद केली गेली आहे, असे सांगून सत्तार यांनी अल्पसंख्याक विभागासाठी शासनाने कशी भरीव तरतूद केली, हे विस्ताराने सांगितले. मनोज जरांगे राजकारणात नसले तरी आयकॉन आहेत. त्यांच्या मागे मराठा समाज आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आमच्या समाजाबद्दल चांगल्या भावना व्यक्त केल्या. त्यामुळे आम्ही त्यांचे स्वागत केले. यामुळे दुसऱ्या लोकांचे पोट दुखण्याचे कारण नाही. जर जरांगेंचे अभिनंदन करणे गुन्हा असेल तर मी रोज करेन, प्रत्येक जिल्ह्यात जाऊन करेन, असे सत्तार म्हणाले.

मनोज जरांगे – मामुली चीज नाही. ते सध्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत, असे सांगायलाही सत्तार विसरले नाहीत. उरलेल्या १०० दिवसांसाठी का होईना. मला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा पालकमंत्री व्हायला आवडेल. नऊ रत्नांपैकी एक रत्न आता दिल्लीला खासदार म्हणून निवडून गेलेले आहे. भुमरे यांची ही रिक्त जागा शिवसेना शिंदे गटाचीच असल्याने अन्य कुणाला ही जागा मिळण्याची शक्यता सत्तार यांनी फेटाळली. मंत्रिमंडळ विस्तार होणार का, हे मुख्यमंत्रीच सांगू शकतील, असे त्यांनी सांगितले. मंत्रिपदासाठी संजय शिरसाट इच्छुक असल्याबद्दल मात्र त्‍यांनी अधिक बोलणे टाळले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट

Latest News

समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहराजवळील गांधेली येथे मंगळवारी (१० मार्च) रात्री ९ च्या सुमारास हभप निवृत्ती...
सोशल मीडियातून ओळख, प्रेम, ४ महिने सहवास, नंतर जातीवरून युवतीला लाथाबुक्क्या!; प्रियकरासह त्याची आई, दोन बहिणी, भावाविरुद्ध ‘ॲट्रॉसिटी’, पाचोडची घटना
भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना
नापिकी, कर्जबाजारीपणाचे आणखी २ बळी!; सिल्लोड, कन्नड तालुक्यातील २ शेतकऱ्यांनी कवटाळले मरण!!
फीट येऊन चुलीवर पडल्याने महिलेचा मृत्यू, सातारा परिसरातील संत ज्ञानेश्वरनगरातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software