पाच वर्षांत आ. संजय शिरसाट यांची संपत्ती वाढली दहापटीने; २०१९ मध्ये ३ कोटींचे तर २०२४ मध्ये ३३ कोटींचे मालक

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघाचे शिंदे गटाचे उमेदवार संजय शिरसाट यांनी शुक्रवारी (२५ ऑक्‍टोबर) उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या शपथपत्रात आपल्या मालमत्तेसह वेगवेगळ्या स्वरुपाची माहिती सादर केली आहे. गेल्या निवडणुकीत (२०१९) शिरसाट यांची मालमत्ता त्‍यांनी सव्वा तीन कोटी रुपयांची असल्याचे नमूद केले होते. गेल्या पाच वर्षांत ही मालमत्ता तब्‍बल दहापटीने […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघाचे शिंदे गटाचे उमेदवार संजय शिरसाट यांनी शुक्रवारी (२५ ऑक्‍टोबर) उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या शपथपत्रात आपल्या मालमत्तेसह वेगवेगळ्या स्वरुपाची माहिती सादर केली आहे.

गेल्या निवडणुकीत (२०१९) शिरसाट यांची मालमत्ता त्‍यांनी सव्वा तीन कोटी रुपयांची असल्याचे नमूद केले होते. गेल्या पाच वर्षांत ही मालमत्ता तब्‍बल दहापटीने वाढून ३३ कोटी झाली आहे. पाच वर्षांत वाढलेल्या संपत्तीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. हा मुद्दा आयताच विरोधकांच्या हाती लागणार आहे.

-२०१९ च्‍या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना त्‍यांनी दोन्ही मुले व मुलगी यांच्या नावे असलेल्या संपत्तीचा उल्लेख केला होता. या वेळी त्यांनी पत्नी व स्वतःच्याच संपत्तीचा उल्लेख केला आहे.
-सध्या आ. शिरसाट यांच्याकडे एकही कार नाही. पत्नीच्या नावे एक १८ लाखांची कार आहे. त्यांच्यावर सात कोटींचे कर्ज असून पत्नीच्या नावेही दोन कोटींचे कर्ज आहे.
-१ कोटी ४२ लाखांचे दागिने, ४४ लाखांची रोकड तर बॉण्ड्स व शेअर्समध्ये एक कोटीं रुपयांच्या घरात गुंतवणूक असल्याचे त्‍यांनी नमूद केले आहे.

-मुंबईस्थित दोन फ्लॅटचे सध्याचे बाजारमूल्य ९ कोटींच्या आसपास असल्याचे त्यांनी शपथपत्रात म्‍हटले आहे.
-सध्या त्‍यांच्याविरुद्ध तीन फौजदारी पण राजकीय स्‍वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. वाळूज, वेदांतनगर व वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना

Latest News

भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना
वैजापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : भरधाव पिकअप वाहनाने दिलेल्या धडकेत २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही घटना पुरणगाव (ता. वैजापूर)...
नापिकी, कर्जबाजारीपणाचे आणखी २ बळी!; सिल्लोड, कन्नड तालुक्यातील २ शेतकऱ्यांनी कवटाळले मरण!!
फीट येऊन चुलीवर पडल्याने महिलेचा मृत्यू, सातारा परिसरातील संत ज्ञानेश्वरनगरातील घटना
३ दिवसांपासून बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह आढळला नदीकाठी!; कन्नडच्या घटनेने खळबळ
विहिरीत पडून १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू, पिशोर येथील दुर्दैवी घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software