छ. संभाजीनगरमध्ये काँग्रेस-ठाकरे गटात बिनसले!; डॉ. काळे म्हणाले, लोकसभेत हरला आहात हे लक्षात ठेवा, उमेदवारही नसताना जागा काय मागता?; तनवाणींचे प्रत्‍युत्तर, आमच्याकडे काँग्रेसपेक्षाही सक्षम उमेदवार, तुमच्या जालन्यातील विजयात आमचा जास्त ‘हातR

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : भाजपसोबत लहान भाऊ, मोठा भाऊ… अशी कुस्ती खेळल्यानंतर आता ठाकरे गटाला काँग्रेससोबतही हाच संघर्ष करावा लागत आहे. राज्‍यस्‍तरावरील नेते एकमेकांवर टीका करत असताना स्थानिक पातळीवरही हा संघर्ष उफाळून आला असून, खा. डॉ. कल्याण काळे यांनी ठाकरे गटाला चांगलेच सुनावले. छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकसभेला हरले होते, हे जागा वाटपात लक्षात ठेवा. इतर […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : भाजपसोबत लहान भाऊ, मोठा भाऊ… अशी कुस्ती खेळल्यानंतर आता ठाकरे गटाला काँग्रेससोबतही हाच संघर्ष करावा लागत आहे. राज्‍यस्‍तरावरील नेते एकमेकांवर टीका करत असताना स्थानिक पातळीवरही हा संघर्ष उफाळून आला असून, खा. डॉ. कल्याण काळे यांनी ठाकरे गटाला चांगलेच सुनावले. छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकसभेला हरले होते, हे जागा वाटपात लक्षात ठेवा. इतर पक्षांतून लोक आयात करून उमेदवारी मिळाल्यागत ते प्रचारही करत असल्याचे शरसंधान डॉ. काळे यांनी साधले. त्यांना लगोलग ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांनी प्रत्‍युत्तरही दिले. आमच्याही सर्व ९ मतदारसंघांत उमेदवार तयार असल्याचे ते म्‍हणाले. एकूणच महाविकास आघाडीतील या घटक पक्षांतील वाद पुढे कोणत्या वळणावर जातो, याबद्दल उत्‍सुकता निर्माण झाली आहे. निवडणुकीत एकमेकांचे उमेदवार जिंकविण्याऐवजी पाडापाडीचे वेध लागल्याची चर्चा सुरू झाली आहे.

शुक्रवारी (२० सप्टेंबर) गांधी भवनात अ. भा. काँग्रेसचे सचिव तथा प्रदेश काँग्रेसचे सहप्रभारी कुणाल चौधरी यांनी शहर व जिल्ह्यातील इच्छुक उमेदवार व त्यांच्या समर्थकांचा मेळावा घेतला. मंचावर निरीक्षक तथा आमदार इम्रान खेडावाला, खासदार व जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे, शहराध्यक्ष शेख युसूफ, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, प्रदेश सरचिटणीस डॉ. जितेंद्र देहाडे, रोजगार व स्वयंरोजगार सेलचे प्रदेशाध्यक्ष योगेश मसलगे पाटील, जगन्नाथ काळे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, ज्येष्ठ नेते प्रा. मोहन देशमुख, कांचनकुमार चाटे, महिला आघाडी शहराध्यक्षा दीपाली मिसाळ यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

यावेळी चौधरी म्हणाले, की बूथ लेव्हल, मतदारयाद्यांवर काम करावे लागेल. मतदार यादीनुसार घरोघरी जाऊन सर्व्हे करा. कोण आपले मतदार आहेत, कोणत्या लोकांची मते आपल्याला मिळू शकतात, जातीनिहाय मतदार किती आदींची माहिती काढा. हे काम येत्या दहा दिवसांत करा, असे निर्देश त्यांनी दिले. सोशल मीडिया सेल ॲक्टिव्ह करा, अशी सूचना करत त्यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल बेताल वक्तव्ये करणाऱ्यांचा समाचारही घेतला. मेळाव्यानंतर चौधरी व खेडावाला यांनी बाजूच्या खोलीत मतदारसंघनिहाय इच्छुक उमेदवारांशी थेट चर्चाही केली. महाविकास आघाडीत एमआयएमला घ्यायचे की नाही, हे वरिष्ठ पातळीवर ठरेल. महाराष्ट्रातील सर्व जागा महाविकास आघाडी लढेल, ज्या जागा काँग्रेसऐवजी महाविकास आघाडीचे उमेदवार लढतील, तिथे काँग्रेसचा कार्यकर्ता पूर्ण ताकदीने काम करेल, असा दावाही त्यांनी केला.

डॉ. काळेंच्या वक्‍तव्‍याने ठिणगी…
नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यातील शीतयुद्ध स्थानिक पातळीवरही उतरले आहे. डॉ. कल्याण काळे यांनी ठाकरे गटाला थेट सुनावले. विधानसभेतच जागा वाढवून मागा. पुढे महापालिका निवडणूक आहे. आता त्यांचे आमदार जास्त आले तर महापालिकेतही ते जागा जास्त मागतील. ते दबंगगिरी करतील. ठाकरे गट लोकसभा निवडणुकीत हरला हे लक्षात असू द्या. तिथे उमेदवारही नाही, तिथे जागा कशी मागता, असा सवाल त्‍यांनी केला.

तनवाणी म्हणाले, काँग्रेसपेक्षा आमच्याकडे सक्षम उमेदवार…
डॉ. कल्याण काळे यांनी ठाकरे गटासोबत थेट पंगा घेतल्याने ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांनीही त्‍यांना खडे बोल लगावले. आमच्याकडे सर्व ९ मतदारसंघांत उमेदवार तयार आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक आमदार शिवसेनेचे निवडून आले आहेत. आमच्याकडे काँग्रेसपेक्षा सक्षम उमेदवार आहेत. कल्याण काळेंच्या जालन्यातील विजयात ठाकरे गटाचा जास्त वाटा होता हे त्‍यांनी लक्षात ठेवावे, असे तनवाणी यांनी काळेंना सुनावले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

टँकर चोरीला जाऊन ८ दिवस उलटल्यावर पोलिसांनी केला गुन्हा दाखल, तक्रारदार चकरा मारून वैतागला, वाळूज एमआयडीसी पोलिसांची कामाची न्यारी तऱ्हा!

Latest News

टँकर चोरीला जाऊन ८ दिवस उलटल्यावर पोलिसांनी केला गुन्हा दाखल, तक्रारदार चकरा मारून वैतागला, वाळूज एमआयडीसी पोलिसांची कामाची न्यारी तऱ्हा! टँकर चोरीला जाऊन ८ दिवस उलटल्यावर पोलिसांनी केला गुन्हा दाखल, तक्रारदार चकरा मारून वैतागला, वाळूज एमआयडीसी पोलिसांची कामाची न्यारी तऱ्हा!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील बजाजनगर येथील वृंदावन पार्कमधून पाण्याचे टँकर चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २ डिसेंबरला...
ना रस्ता, ना पाणी, ना ड्रेनेज सुविधा... वडगाव कोल्हाटीतील महिला आक्रमक, रस्‍त्‍यावरील सांडपाण्याला ‘प्रशासन’ म्हणत वाहिली श्रद्धांजली!
एसटी बसने दागिने घेऊन प्रवास करत असाल तर सतर्क व्हा, चोर महिलांच्या टोळ्या तुमचे दागिने चोरून होतील गायब!, शास्‍त्रीनगरातील महिलेचेही सव्वा लाखाचे दागिने नेले...
सिल्लोडच्या अन्वीत तरुणाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या
आदर्श घोटाळ्यातील संशयित महिला चक्क शिंदे गटात दाखल!  
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software