Business News : एकेकाळी ग्लॅमरस मानले जायचे... सिगारेट उद्योग प्राणघातक कसा घोषित झाला?

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

६० आणि ७० च्या दशकात सिगारेट ओढणे हे केवळ व्यसन नव्हते, तर ते ग्लॅमरचे प्रतीक होती. पण जसजशी समाजाला धूम्रपानाच्या धोक्यांची जाणीव झाली तसतसे चित्रपटांमध्ये त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला. आता अशी वेळ आली आहे, की चित्रपटांपूर्वी धूम्रपानामुळे होणाऱ्या कर्करोगाबद्दलचे इशारे दिसू लागले आहेत. सिगारेटच्या पाकिटांवरही इशारे छापलेले असतात.

सिगारेट ग्लॅमरस ते प्राणघातक...
११ जानेवारी १९६४ रोजी अमेरिकेचे डॉ. लूथर टेरी यांनी तंबाखूचा कर्करोगाशी संबंध जोडणारा अहवाल प्रसिद्ध केला. सुमारे ७,००० वैज्ञानिक लेखांचे पुनरावलोकन केल्यानंतर, अहवालात प्रथमच अधिकृतपणे मान्य करण्यात आले की धूम्रपान हे फुफ्फुसांच्या कर्करोगाचे मुख्य कारण आहे. त्यानंतरच सिगारेटच्या पाकिटांवर चेतावणी अनिवार्य करण्यात आली आणि दूरदर्शन जाहिरातींवर बंदी घालण्यात आली. यामुळे तंबाखूला त्याच्या "ग्लॅमरस’ प्रतिमेतून काढून टाकण्यात आले आणि ते "घातक’ घोषित करण्यात आले.

७० लाख कोटी रुपयांचा उद्योग
जागतिक सिगारेट उद्योग अंदाजे ७७० अब्ज डॉलर (अंदाजे ७० लाख कोटी रुपये) किमतीचा असल्याचा अंदाज आहे. हा उद्योग दरवर्षी २.२५ टक्के दराने वाढत आहे. २०३१ पर्यंत, हा उद्योग अंदाजे ८२१ अब्ज डॉलर्सचा असण्याची अपेक्षा आहे. भारतात, हा उद्योग २९.२ अब्ज डॉलर्स (अंदाजे रु. २.६४ लाख कोटी) असण्याचा अंदाज आहे. २०३४ पर्यंत हा उद्योग ६६ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त असू शकतो.

सिगारेट ओढण्याबद्दल किती दंड?
भारतात सिगारेट ओढण्याबद्दल दंड आहे. घरी सिगारेट ओढल्यास दंड भरावा लागेल असे नाही. सार्वजनिक ठिकाणी बिडी किंवा सिगारेट ओढणे हा दंडनीय गुन्हा मानला जातो. उल्लंघन करणाऱ्यांना किमान २०० रुपये दंड होऊ शकतो, जो ५०० रुपयांपर्यंत वाढवता येतो. जर एखाद्या व्यक्तीने दंड भरला नाही तर त्यांच्याविरुद्ध न्यायालयात खटला दाखल करता येतो.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक

Latest News

आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आ. संजय केणेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात...
कामगारानेच मालकाचा केला विश्वासघात!; मोंढा नाक्यावरील मेट्रो वाईन शॉपमध्ये काय घडलं... व्हिडीओसह, पहा कशी केली चोरी...
माणुसकीचे अनोखे दर्शन : मुलाच्या फीचे हरवलेले ३० हजार रुपये तत्परतेने केले महिलेस परत, सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रामाणिकपणा, सिडकोतील घटना
सिटी चौक भागातील अग्रवाल केबल दुकान फोडले
स्मार्टफोनवरील व्हॉल्यूम बटणे केवळ आवाज वाढवणे, कमी करण्यासाठी नाहीत... अनेक कामांसाठीही करू शकतात उपयोग!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software