व्यायाम निरोगी राहण्याचा मूलमंत्र! शरीर संपत्ती ही सर्वात मोठी संपत्ती !!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

सोमेश सोपानराव इंगळे, फार्मासिस्ट निवेदक रुग्णसेवक, मो. 8668591637

दैनंदिन जीवनाच्या व्यापात मनुष्य शरीराकडे दुर्लक्ष करतो. पद, प्रतिष्ठा, पैसा सगळं काही कमावतो. पण शरीर संपत्ती, जी सर्वात मोठी संपत्ती आहे याचा मात्र विसर पडतो. अगदी कमी वयात आलेल्या विविध आजारांच्या व्याधी याचं मूळ कारण म्हणजेच व्यायामाची कमतरता आणि फास्ट फूडचे सेवन. तेलकट, तूपकट, थंड, शीतपेय, मैदा, बेकरी प्रॉडक्ट इत्यादी हे जास्त प्रमाणात घेण म्हणजेच आजारांना आमंत्रण देणं. पण यातून आपण चार हात दूर राहू शकतो ते व्यायामाने.

चालणे हा सर्वात उत्तम व्यायाम आणि चालता बोलता मित्रांसोबत गप्पा मारत करू शकत असणारा सगळ्यात सोपा व्यायाम. चालण्याने शरीर सुदृढ होते. रक्तदाब, मधुमेह, मेंदूचे आजार, पचनाचे आजार, ॲसिडिटी, बद्धकोष्ठता इत्यादी आणि सर्वात महत्त्वाचे सकारात्मकता चालण्याने अजून वाढते.
हृदय आणि फुफ्फुसे निरोगी होतात : हृदय मजबूत होते आणि रक्तवाहिन्यासंबंधी प्रणाली अधिक कार्यक्षम बनते. ज्यामुळे शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा सुधारतो. 
वजन नियंत्रणात राहते : कॅलरी बर्न होतात,ज्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. 
रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते : उच्च रक्तदाब कमी होतो आणि ‘खराब' कोलेस्ट्रॉल (LDL) कमी होऊन ‘चांगले' कोलेस्ट्रॉल (HDL) वाढते. 
स्नायू मजबूत होतात : नियमित चालण्याने स्नायूंची ताकद आणि सहनशक्ती वाढते. 
रोगप्रतिकारशक्ती वाढते : चालण्याने रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत करतो. 
आम्ही सर्व मुले वर्ग ५ ते वर्ग १० पर्यंत शेजारील गावामध्ये पायी शाळेत जायचो. त्याची सवय अंगी जडल्यामुळे चालणे सोपे वाटते सवय झाली की अगदी सोप वाटतं. त्यामुळं मानवाचा मित्र आहे चालणे. पूर्वी गाड्या नव्हत्या तर सर्व कामे पायीच व्हायची तेव्हा लोग निरोगी असायचे हार्ट अटॅक,स्ट्रोक इत्यादी आजार कधीतरीच कानी पडायचे.
मानसिक फायदे
नैराश्य आणि तणाव कमी होतो : व्यायामामुळे नैराश्य, चिंता आणि तणाव कमी होण्यास मदत होते. 
मनःस्थिती सुधारते : मनःस्थिती सुधारते आणि उत्साहात वाढ होते. 
चांगली झोप लागते : नियमित व्यायामामुळे शांत आणि चांगली झोप लागते. 
ऊर्जेची पातळी वाढते : दिवसभर ताजेतवाने वाटते आणि ऊर्जेची पातळी वाढते.
आम्ही मित्रमंडळी ४ वर्षापासून सातत्याने व्यायाम करतो व्यक्तिगत आणि शारीरिक प्रगती सकारात्मकपणा या गोष्टी आपसूक त्यातून मिळतात..

प्राणायाम 
स्ट्रेस लेव्हल कमी होते प्राणायाम ध्यानात मदत करतो.
झोप नीट होते आजकाल तणावामुळे झोपेशी संबंधित समस्या वाढत आहेत. 
रक्तदाब नियंत्रित करते.
फुफ्फुसाचे कार्य सुधारते.
मानसिक रोगांपासून संरक्षण करते.

योगा 
वास्तविक योगा हा व्यायामाचा प्रकार आपला भारतीय आहे,आपणच आपल्या मूळ संस्कृतीपासून दूर चाललो की काय असं वाटायला लागलंय..
योगा केल्यामुळे
लवचिकता आणि ताकद: योगामुळे शरीराची लवचिकता आणि स्नायूंची ताकद वाढते.
ऊर्जा: योगाभ्यासाने शरीरात ऊर्जा वाढते आणि उत्साह टिकून राहतो.
वजन नियंत्रण: योगामुळे चरबी कमी होते आणि स्नायू मजबूत होतात, ज्यामुळे वजन नियंत्रित राहते.
हृदय व रक्तवाहिन्यांचे आरोग्य: योगामुळे रक्तदाब कमी होतो आणि हृदयाचे आरोग्य सुधारते.
रोगप्रतिकारशक्ती: नियमित योगामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.
आंतरिक संतुलन: योगामुळे शरीर आणि मनामध्ये स्थिरता येते.
आरोग्याच्या समस्यांवर नियंत्रण: योगामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
शरीराची जाणीव : योगाभ्यासाने स्वतःच्या शरीराची अधिक जाणीव होते.
पूर्वी सकाळी उठून शेणपणी दूध काढणे शेतातील कामे असायची आता सर्व तंत्रज्ञानयुक्त झाल आणि शारीरिक गतिविधि अगदी कमी झाल्या. आळस हा माणसाचा शत्रू आहे असं म्हणतो पण प्रत्यक्षात मात्र आळशी होत चाललो गरज नसताना गाड्या वापरायला लागली. त्यामुळे प्रदूषणाला आमंत्रण देऊ लागलो ग्लोबल वार्मिंग वाढू लागलो. ओझोन लेव्हल कमी व्हायला लागली आपण व्यायाम आणि चालणे वाढवले आवश्यक तिथेच गाड्या वापरायला लागलो आणि गावात शहरात गाडी न वापरता पायी चालत छोटी छोटी कामे करायला लागलो तर या सर्व गोष्टींना सुद्धा आळा बसेल. गेली सात आठ वर्षे आरोग्यसेवेत व आरोग्यव्यवस्थेत काम करत असतांना  रुग्णांच्या अडचणी समजून घेताना या गोष्टी जाणवल्या अगदी तरुण रुग्ण जेव्हा समोर येतात आणि या सर्व गोष्टी जाणवतात तेव्हा त्रास होतो म्हणून हे लिहिण्याच्या खटाटोप केला..

(लेखक फार्मासिस्ट, निवेदक, रुग्णसेवक असून, चंदनपूर ता. चिखली जि.बुलडाणा येथील रहिवासी आहेत. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ

Latest News

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उसने घेतलेले पैसे परत देत नाही म्हणून तिघांनी मिळून स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून...
मोकाट कुत्र्यांच्या झुंडीने चिमुकल्यावर चढवला हल्ला, चिमुकला आक्रोश करत असताना आणखी लचके तोडले, बायजीपुऱ्यातील घटनेने महापालिकेप्रती संतापाची लाट, जी. श्रीकांत पाठ थोपटून घेण्याऐवजी अधिकाऱ्यांना कामाला लावा, नागरिकांची अपेक्षा
छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी; गुरुवारपासून होणार प्रारंभ
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software