शहरासह जिल्ह्याला ‘अवकाळी’चा तडाखा!; गहू, हरभरा,  मका, कांद्याचे १०० टक्के नुकसान, तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हिंदू नववर्षाच्या स्वागताच्या पूर्वसंध्येला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. बुधवारी (१८ मार्च) सायंकाळनंतर छत्रपती संभाजीनगर शहरासह सोयगाव, सिल्लोड, कन्नड, फुलंब्री, खुलताबाद आणि गंगापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. काही ठिकाणी गारपीटही झाली. यामुळे काढणीला आलेला गहू, हरभरा, मका आणि कांदा पिकाचे १०० टक्के नुकसान झाले असून, शेतकऱ्यावर मोठे संकट कोसळले आहे. शासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी केली जात आहे.

छत्रपती संभाजीनगर शहर, परिसरात रात्री १० नंतर वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. पाऊस सुरू होताच वीज गायब झाल्याने शहराचा बहुतांश भाग अंधारात बुडाला. हर्षनगरात दोन घरांत पावसाचे पाणी शिरले. अग्निशमन दलाने धावून मदत कार्य केले. सिंधी कॉलनी, क्रांती चौक, सिल्लेखाना, समर्थनगर, नागेश्वरवाडी, मील कॉर्नर, नेहरू भवन, टाऊन हॉल, नंदनवन कॉलनी, छावणी या भागांत गाराही पडल्याचे रहिवाशांनी सांगितले. भावसिंगपुऱ्यातील भीमनगरात झाड पडले. शहराच्या विविध भागांत वीज गेल्याने मध्यरात्रीनंतर ती सुरळीत करण्यात महावितरणला यश आले.

सोयगाव शहरासह तालुक्याच्या बहुतांश भागात सायंकाळी ६:३० ला तासभर गारपीट झाली. अनेक गावांत गारांचा खच साचला. वादळी वाऱ्याने रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले.जरंडी, निंबायती, धिंगापूर, फर्दापूर येथे प्रामुख्याने शेतकऱ्यांना प्रचंड नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. कन्नड तालुक्यातही  विजांच्या कडकडाटासह पावसाने झोडपून काढले. चिंचोली लिबाजी, नेवपूर, वाकी, तळनेर, घाटशेंद्रा, टाकळी अंतुर, बरकतपूर, जामडी, दहिगाव, शेलगाव, नाचनवेल आणि करंजखेड भागात मोठे नुकसान घडवले. अनेक शेतकऱ्यांचा गहू पावसात भिजल्याने उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे.

सिल्लोड तालुक्यात सायंकाळी वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट झाली. केळगाव, धावडा, आमठाणा, देऊळगाव बाजार, शिंदेफळ, तळणी, घाटनांद्रा, उंडणगाव शिवारातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे समोर येत आहे. कांदा बियाणे पिकाकडून मोठ्या उत्पन्नाची असलेली अपेक्षा फोल ठरली आहे. मिरची व इतर भाजीपाला पिकांचेही गारपिटीमुळे नुकसान झाले. फुलंब्री, खुलताबाद व पैठण तालुक्यात रात्री ११ नंतर अवकाळी पावसाने तडाखा दिला. गंगापूर तालुक्यातील गोदापट्ट्यातील गावांत रात्री गारपीट झाली. लासूर स्टेशन भागातही मुसळधार पावसाने गहू आडवा झाला आहे. छत्रपती संभाजीनगर शहराजवळील वाळूज औद्योगिक वसाहत परिसरातही रात्री अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. गारपीट झाली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

शहरासह जिल्ह्याला ‘अवकाळी’चा तडाखा!; गहू, हरभरा,  मका, कांद्याचे १०० टक्के नुकसान, तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी

Latest News

शहरासह जिल्ह्याला ‘अवकाळी’चा तडाखा!; गहू, हरभरा,  मका, कांद्याचे १०० टक्के नुकसान, तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शहरासह जिल्ह्याला ‘अवकाळी’चा तडाखा!; गहू, हरभरा,  मका, कांद्याचे १०० टक्के नुकसान, तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हिंदू नववर्षाच्या स्वागताच्या पूर्वसंध्येला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. बुधवारी (१८ मार्च)...
मागे न पाहताच रिव्हर्स घेणारा हायवा ठरला १८ वर्षीय मनस्वीचा काळ!; रुग्णालयात वडिलांना डबा घेऊन जात होती, चिकलठाण्याजवळील दुर्दैवी घटना
ब्रिजवाडी जमीन गैरव्यवहार प्रकरणी विशेष तपास पथक गठीत, तीन महिन्यांत अहवाल सादर होणार, जिल्ह्यातील जमीन गैरव्यवहारांचीही होणार चौकशी
वाळूज महानगरात दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेचे गंठण हिसकावले!
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत औषध निरीक्षक गट-ब चाळणी परीक्षा २२ मार्चला; छत्रपती संभाजीनगरमध्ये ११ हजार ६४० उमेदवार देणार परीक्षा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software