९५ वर्षीय दगडू राऊत यांच्या काकडा आरतीने जागे व्हायचे वडोद बाजार, आता कानी पडणार नाहीत सूर, देवाच्या दारातच देवाज्ञा!; अवघे गाव हळहळले!!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

फुलंब्री (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : नित्यनेमाने रोज पहाटे उठून मंदिरात काकडा आरती घेणारे दगडू भीका राऊत (वय ९५) यांचे सूर आता वडोदबाजारमध्ये (ता.  फुलंब्री) ग्रामस्थांच्या कानी पडणार नाहीत. गुरुवारी (२० नोव्‍हेंबर) पहाटे राऊत हे काकड आरतीसाठी मंदिरात आले अन्‌ त्याचा देवाच्या दारातच त्यांना देवाज्ञा झाली. गावातील अन्य भजनी मंडळी मंदिरात आल्यावर त्यांना ते बेशुद्धावस्थेत दिसले. तातडीने कुटुंबीयांना कळवत रुग्णालयात नेण्यासाठी प्रयत्न सुरू झाले, मात्र राऊत यांची प्राणज्योत मालवली...

दगडू राऊत तीन दशकांहून अधिक काळ नित्यनेमाने विठ्ठल -रुक्मिणी मंदिरात पहाटेची काकड आरती म्हणायचे. काकड आरती प्रथम त्यांनीच सुरू केली होती. त्यांना भजन - गायनाचा छंद होता. वर्षभरापूर्वी काकड आरतीसाठी मंदिराकडे जात असताना मुख्य रस्ता ओलांडताना एका दुचाकीस्वाराने धडक दिली होती. त्याही परिस्थितीत त्यांनी काकडा आरतीत खंड पडू दिला नव्हता. गुरुवारी दुपारी दोनला वडोदबाजार येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

विश्लेषण : अंबादास दानवेंची ‘दादा’गिरी चुकीचीच!; उमेदवार निवडून आणता येत नाहीत, जे निवडून आले त्यांना सांभाळता येत नाहीत मग दुसऱ्यावर त्रागा करून उपयोग काय?

Latest News

विश्लेषण : अंबादास दानवेंची ‘दादा’गिरी चुकीचीच!; उमेदवार निवडून आणता येत नाहीत, जे निवडून आले त्यांना सांभाळता येत नाहीत मग दुसऱ्यावर त्रागा करून उपयोग काय? विश्लेषण : अंबादास दानवेंची ‘दादा’गिरी चुकीचीच!; उमेदवार निवडून आणता येत नाहीत, जे निवडून आले त्यांना सांभाळता येत नाहीत मग दुसऱ्यावर त्रागा करून उपयोग काय?
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्‍ट वृत्तसेवा) : विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते, माजी आमदार तथा ठाकरे गटाचे जिल्‍हाप्रमुख अंबादास दानवे यांनी...
आरटीओ कार्यालयातच भीषण दुर्घटना : चालकाने ट्रक मागे घेताना निष्काळजीपणा केला अन्‌ एजंटचा चाकाखाली येऊन मृत्यू!
व्हिडीओ : बजाजनगरात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला, सीसीटीव्हीत थरार कैद
भाजपची खेळी, इतर पक्षांची बसली दातखिळी!; जिल्ह्यातील ९ पैकी ६ पं.स.चे सभापतिपद केले काबिज, जाणून घेऊ राजकारण कसे रंगले...
रिलस्टार अरुण तुपेचा घरातच आढळला मृतदेह!; सोशल मीडियावर दोन लाख फॉलोअर्स, पोस्ट मार्टेमच्या अंतिम अहवालातून समोर येणार कारण, पोलीस काय म्हणाले...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software