- News
- एक्सक्लुझिव्ह
- Good News : छत्रपती संभाजीनगरला १०० इलेक्ट्रिक बस डिसेंबरपर्यंत मिळणार!
Good News : छत्रपती संभाजीनगरला १०० इलेक्ट्रिक बस डिसेंबरपर्यंत मिळणार!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : सीएससीएन वृत्तसेवा) : पीएम ई-बस योजनेतून छत्रपती संभाजीनगर शहराला केंद्र शासन १०० ई-बस डिसेंबर अखेरपर्यंत देणार आहे. पुढील वर्षी जानेवारीत नवीन ई-बस शहरात धावतील. यासाठी लागणारा अत्याधुनिक डेपो स्मार्ट सिटी प्रशासनाने जाधववाडी येथे ११ एकर जागेवर उभारला आहे. काय आहे योजना?-केंद्र शासनाकडून ऑगस्ट २०२३ मध्ये पीएम ई-बस सेवा योजनेची घोषणा.-दहा […]
छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : सीएससीएन वृत्तसेवा) : पीएम ई-बस योजनेतून छत्रपती संभाजीनगर शहराला केंद्र शासन १०० ई-बस डिसेंबर अखेरपर्यंत देणार आहे. पुढील वर्षी जानेवारीत नवीन ई-बस शहरात धावतील. यासाठी लागणारा अत्याधुनिक डेपो स्मार्ट सिटी प्रशासनाने जाधववाडी येथे ११ एकर जागेवर उभारला आहे.
-केंद्र शासनाकडून ऑगस्ट २०२३ मध्ये पीएम ई-बस सेवा योजनेची घोषणा.
-दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या शहरांना योजनेत सहभागाची संधी.
-छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या प्रस्तावाला मंजुरी.
-केंद्राकडून शहरासाठी शंभर इलेक्ट्रिक बस देण्यास हिरवी झेंडी.
-बससाठी लागणारा मोठा डेपो अगोदरच स्मार्ट सिटीने तयार करून ठेवला.
-आणखी डेपो वाळूज एमआयडीसीच्या आरक्षित जागेवर स्मार्ट सिटीमार्फत बांधणार.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी १०० ई- बस शहरात आणण्यासाठी महापालिकेने हालचाली गतिमान केल्या आहेत. केंद्र सरकारने देखील बसेस खरेदीची निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे. स्मार्ट सिटीकडून सध्या १०० डिझेल बसेस २०१८ पासून चालविण्यात येत आहेत. या सेवेला नागरिकांकडून चांगला प्रतिसादही मिळत आहे. स्मार्ट सिटीच्या ताफ्यात १०० ई- बस दाखल झाल्यावर शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणखी बळकट होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
17 Dec 2025 17:32:08
बीड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : कला केंद्रातील मुलीला अंबाजोगाई येथील साई लॉजवर नेऊन तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली...

