आयुष्यभर लोकांची कामे केली, सामाजिक कार्यकर्तीचा ४ दिवस घरात मृतदेह कुजला, पण बघायला कुणी आले नाही...कन्नडची धक्कादायक घटना 

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

कन्नड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : अविवाहित राहून सामाजिक कार्य करणाऱ्या ६५ वर्षीय शकुंतला यादव देहाडे यांचा शनिवारी (३ डिसेंबर) दुपारी १२:३० च्या सुमारास कन्नड शहरातील शिवनगरमध्ये झोपेतच मृत्यू झाल्याचे समोर आले. घरातून दुर्गंधी येऊन लागल्याने हा प्रकार समोर आला.

शकुंतला देहाडे यांच्या कुटुंबात कोणीही नव्हते. त्या एकट्याच राहत होत्या. सामाजिक कार्यकर्त्या म्हणून वावरताना लोकांची शासकीय कामे करून द्यायच्या. चार दिवसांपूर्वी नेहमीप्रमाणे जेवण करून झोपी गेल्या होत्या. शनिवारी सकाळी १० ला त्यांच्या घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने नागरिकांनी शहर पोलिसांना कळवले. सहायक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी यांनी सहकाऱ्यांसह घटनास्‍थळी धाव घेतली. घराचा दरवाजा आतून बंद होता.

शकुंतलाबाईंच्या काही नातेवाइकांना बोलावून दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी लाकडी दिवाणावर शकुंतला मृतावस्थेत दिसून आल्या. मृतदेह फुगलेला होता व कुजण्यास सुरुवात झाला होता. त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कन्नड ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. झोपेतच शकुंतला देहाडे यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकारी डॉ. राम पुंगळे यांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी कन्नड शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना

Latest News

भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना
वैजापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : भरधाव पिकअप वाहनाने दिलेल्या धडकेत २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही घटना पुरणगाव (ता. वैजापूर)...
नापिकी, कर्जबाजारीपणाचे आणखी २ बळी!; सिल्लोड, कन्नड तालुक्यातील २ शेतकऱ्यांनी कवटाळले मरण!!
फीट येऊन चुलीवर पडल्याने महिलेचा मृत्यू, सातारा परिसरातील संत ज्ञानेश्वरनगरातील घटना
३ दिवसांपासून बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह आढळला नदीकाठी!; कन्नडच्या घटनेने खळबळ
विहिरीत पडून १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू, पिशोर येथील दुर्दैवी घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software