प्रेमीयुगुल पळाले, डॉक्‍टरांवर आले, करमाडमध्ये काय राडा झाला...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : तू आमची मुलगी तुझ्या आत्याच्या नातवासोबत पळून जाण्यास मदत केली आहे, ते कोठे आहे तुला माहीत आहे, असा आळ डॉक्‍टरांवर घेऊन जमावाने दवाखान्यातून बेदम मारहाण करत रस्‍त्‍यावर आणले आणि पुन्हा बेदम मारहाण केली. डॉक्‍टरांचे कुटुंबीय वाचवायला आले असता त्‍यांनाही मारहाण करण्यात आला. हा राडा गुरुवारी (१८ सप्‍टेंबर) सकाळी पावणेनऊच्या सुमारास करमाड (ता. छत्रपती संभाजीनगर) येथे घडला.

जगदीश पुंडलिक कोरडे, परमेश्वर पुंडलिक कोरडे, राजेश उर्फ उध्दव पांडुरंग कोरडे, योगेश पांडुरंग कोरडे, ज्ञानेश्वर भानुदास कोरडे व इतर (सर्व रा. करमाड) यांचा गुन्हा दाखल केलेल्यांत समावेश आहे. डॉ. जिजा आनंदराव कोरडे (वय ५६, रा. करमाड ता. छत्रपती संभाजीनगर) यांनी त्‍यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. त्‍यांचा करमाड येथे लाडसावंगी रोडवर जागृती क्लिनिक नावाने दवाखाना आहे.

गुरुवारी (१८ सप्‍टेंबर) सकाळी पावणेनऊच्या सुमारास ते गावातील मारोती मंदिरात दर्शन करून क्लिनिक उघडण्यासाठी गेले. तेथे त्यांच्या भावकीतील जगदीश पुंडलिक कोरडे हा आला. त्याने डॉ. कोरडे यांना जीवे मारण्याची धमकी देऊन गळा पकडून डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत ओढत आणले. तेथे परमेश्वर पुंडलिक कोरडे, राजेश उर्फ उध्दव पांडुरंग कोरडे, योगेश पांडुरंग कोरडे, ज्ञानेश्वर भानुदास कोरडे व इतर आले. सर्व जण म्हणाले, की तू आमची मुलगी तुझ्या आत्याच्या नातवासोबत पळून जाण्यास मदत केली आहे, ते कोठे आहे तुला माहीत आहे. तू पोलीस स्टेशनला फोन केला की आमची तक्रार घेऊ नका, असे म्हणून त्यांनी शिवीगाळ करून सर्वांनी बेदम मारहाण सुरू केली. पायावर, पाठीवर लाथेने, चपलेने मारले.

चापटबुक्यांनी तोंडावर, मानेवर मुक्कामार दिला व जीवे मारण्याची धमकी दिली. तेथे सुरेश आनंदराव कोरडे, मदन आनंदराव कोरडे, अनिल सारंगधर ढवळे हे भांडण सोडविण्यासाठी आले असता त्यांनाही लोटलाट केली व सर्वांना मारत आणले. राजेश कोरडे म्हणाला, की गाडी घेऊन या याला गावाचे बाहेर घेऊन जाऊ, मग मारू. त्‍यांच्या तावडीतून सुटून डॉ. जिजा कोरडे पळत पोलीस ठाण्यात आले. हल्लेखोरही त्‍यांच्या मागोमाग आले. भांडणात झटापटीत डॉ. कोरडे यांच्या गळ्यातील ४ तोळे २ ग्रॅम सोन्याची चेन कोठेतरी पडली. हल्लेखोरांनी त्यांचा मुलगा सुशील यालाही लाथाबुक्क्या व चापटाने मारहाण केली. अधिक तपास पोलीस अंमलदार विजयसिंग जारवाल करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ

Latest News

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उसने घेतलेले पैसे परत देत नाही म्हणून तिघांनी मिळून स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून...
मोकाट कुत्र्यांच्या झुंडीने चिमुकल्यावर चढवला हल्ला, चिमुकला आक्रोश करत असताना आणखी लचके तोडले, बायजीपुऱ्यातील घटनेने महापालिकेप्रती संतापाची लाट, जी. श्रीकांत पाठ थोपटून घेण्याऐवजी अधिकाऱ्यांना कामाला लावा, नागरिकांची अपेक्षा
छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी; गुरुवारपासून होणार प्रारंभ
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software