खुलताबादची धक्कादायक घटना : ती अस्वस्थ होती, काहीच बोलत नव्हती... अचानक जागेवरून उठली, धावत्या बसच्या दारातून घेतली उडी, मागच्या चाकाखाली येऊन ठार!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

खुलताबाद (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : काहीशी अस्वस्थ दिसत होती, कुणाशी काहीच बोलत नव्हती... अचानक ती जागेवर उठली, धावत्या बसच्या दरवाजातून उडी घेतली... चालकाने ब्रेक दाबेपर्यंत मागच्या चाकाखाली येऊन तिचा जागीच मृत्यू झाला... एकच गोंधळ उडाला... हा थरार प्रसंग सोलापूर-धुळे महामार्गावरील गल्लेबोरगावजवळ (ता. खुलताबाद) बुधवारी (२९ ऑक्टोबर) दुपारी तीनच्या सुमारास घडला.

कांताबाई योगेश मरमट (वय ४०, रा. देहाडेनगर, हर्सूल सावंगी, ता. छत्रपती संभाजीनगर) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या कन्नड- छत्रपती संभाजीनगर एसटी बसमध्ये (क्र. एमएच १४ बीटी ३०३८) गल्लेबोरगाव येथून बसल्या. त्यांनी वेरूळचे तिकीट घेतले. बस पळसवाडी परिसरातून जात असताना अचानक दरवाजाकडे गेल्या आणि उडी घेतली. बसच्या मागील चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. माहिती मिळताच खुलताबाद पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह वेरूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणला. चालक, वाहक आणि प्रवाशांचे जबाब नोंदवले आहेत. चालक बळीराम राठोड म्हणाले, की अचानक मागे प्रवाशांचा गोंधळ ऐकू आला. महिलेने उडी मारल्याचे ऐकताच तत्काळ बस बाजूला घेऊन थांबवली.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सिटी चौक परिसरातून २१ वर्षीय तरुणी बेपत्ता

Latest News

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software