भवनमधील पूल नऊ वर्षांपासून अर्धवट; त्यातच खड्ड्यात ट्रक अडकला अन् सिल्लोडजवळ जळगाव महामार्ग ४.३० तास जाम!, शेकडो वाहने अडकून पडली...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : सिल्लोड तालुक्यातील भवन येथील पूर्णा नदीवरील पूल नऊ वर्षांपासून अर्धवट असल्याचा फटका बुधवारी (२९ ऑक्टोबर) छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावरून जाणाऱ्या शेकडो वाहनधारकांना बसला. या पुलावरील खड्ड्यात ट्रक अडकला. त्यामुळे सुमारे साडेचार तास वाहतूक कोंडी झाली होती. वाहनधारकांबरोबरच पोलिसांनाही त्रास सहन करावा लागला.

पुलाच्या बांधकामाकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अक्षम्य दुर्लक्ष सुरू आहे. त्यामुळे नेहमीच वाहतूक कोंडी होते. बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास मालवाहतूक करणारा एक ट्रक या पुलावरील खड्ड्यात अडकून नादुरुस्त झाला. ट्रक पुलावरच अडकल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक खोळंबली. अवघ्या काही मिनिटांतच महामार्गावर भवनच्या दिशेने सिल्लोडपर्यंत ४ किलोमीटर तर दुसऱ्या बाजूला केऱ्हाळा फाट्यापर्यंत चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

सुमारे साडेचार तास ही वाहतूक कोंडी कायम होती. यामुळे कार, बस, ट्रक, दुचाकी यांच्यासह शेकडो नागरिक या कोंडीत अडकले होते. महत्त्वाचे म्हणजे या कोंडीत सिल्लोडहून छत्रपती संभाजीनगरकडे निघालेली एक शासकीय रुग्णवाहिकादेखील तब्बल पाऊण तास अडकून पडली होती. वेळेत उपचार न मिळू शकल्याने या रुग्णवाहिकेतील रुग्णाची तब्येत चिंताजनक बनली होती. या रुग्णाची घालमेल पाहून तिथे उपस्थित असलेल्या लोकांमध्ये संतापाची लाट उसळली होती.

पोलिसांनी बुजवला खड्डा
महामार्गावर वाहतूक कोंडी वाढतच चालल्याने अखेर सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. महामार्गाच्या देखभालीची जबाबदारी असलेली यंत्रणा येत नसल्याचे पाहून अखेर ठाकरे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक लहू घोडे व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी माती- दगड टाकून तो खड्डा तात्पुरता बुजवला. या सर्वांच्या प्रयत्नामुळे अखेर या महामार्गावरील वाहतूक पूर्ववत होऊ शकली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरातून ५ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाने खळबळ

Latest News

छत्रपती संभाजीनगरातून ५ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाने खळबळ छत्रपती संभाजीनगरातून ५ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाने खळबळ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्ह्यातून ५ अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरातील ३...
प्रवासी म्हणून बसवले, दुसरीकडेच रिक्षा नेत विद्यार्थ्याला लुटले!; मुकुंदवाडीतील घटना
गव्हाबरोबर गांजा वाढवला... पोलिसांचा शेतात छापा, ५ लाखांचा गांजा जप्त, शेतकऱ्याला अटक, करमाडजवळील कारवाई
वाळूज MIDC तील कमळापुरात दोन गटांत सशस्त्र हाणामारी; ४ गंभीर जखमी, वरिष्ठ पोलिसांचा फौजफाटा घटनास्‍थळी, परिस्थितीवर नियंत्रण (व्हिडीओसह)
१९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software