धक्कादायक : फुलंब्रीच्या ३ शेतकऱ्यांनी कवटाळले मरण, नापिकी-कर्जबाजारीपणाचे बळी!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

फुलंब्री (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्यस्त असलेल्या सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांकडे पाहण्यास वेळ नसल्याने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेतकरी आत्‍महत्‍या वाढत चालल्या आहेत. आता फुलंब्री तालुक्यात ३ शेतकऱ्यांनी आत्‍महत्‍या केल्याची बाब समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

घटना पहिली : खामगाव गोरक्ष (ता. फुलंब्री) येथे नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून ३६ वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (७ जानेवारी) सकाळी १० च्या सुमारास समोर आली. बंडू देवराव म्हस्के (रा. खामगाव गोरक्ष) असे आत्‍महत्‍या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. बंडू हे अल्पभूधारक शेतकरी होते. मोलमजुरीची कामेही करत असत.

शेतीसाठी बचतगटाचे कर्ज घेतले होते. खरीप हंगामात अतिवृष्टी व नापिकीमुळे शेतातून फारसे उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे ते चिंतित होते. यातूनच त्यांनी शेतात झाडाला गळफास घेतला. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी वडोद बाजार पोलिसांना कळवत फासावरून बंडू यांना उतरवून फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. बंडू म्हस्के यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी व दोन मुली असा परिवार आहे.

घटना दुसरी : कर्जबाजारीपणामुळे कान्होरी येथील राजेश दामोदर सोटम (वय २५) या शेतकऱ्याने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतला. ही घटना मंगळवारी (६ जानेवारी) सायंकाळी कान्होरी शिवारात समोर आली. राजेश मळ्यात राहत होता. त्याने गळफास घेतल्याचे लक्षात येताच कुटुंबीय, नागरिकांनी तत्काळ फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. राजेश अविवाहित होता. त्याच्या वडिलांच्या नावे ४ एकर शेती आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतीसाठी खासगी सावकार आणि सहकारी संस्थांकडून सुमारे ३ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्जबाजारीपणामुळे तो मानसिक तणावात होता.
घटना तिसरी : निधोना येथील संतोष हैबतराव काटकर (वय ४२) यांनी गाव शिवारातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. ते कर्जबाजारीपणामुळे चिंतित होते. यातूनच त्यांनी आत्‍महत्‍या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई-वडील, दोन भाऊ असा परिवार आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना

Latest News

भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना
वैजापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : भरधाव पिकअप वाहनाने दिलेल्या धडकेत २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही घटना पुरणगाव (ता. वैजापूर)...
नापिकी, कर्जबाजारीपणाचे आणखी २ बळी!; सिल्लोड, कन्नड तालुक्यातील २ शेतकऱ्यांनी कवटाळले मरण!!
फीट येऊन चुलीवर पडल्याने महिलेचा मृत्यू, सातारा परिसरातील संत ज्ञानेश्वरनगरातील घटना
३ दिवसांपासून बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह आढळला नदीकाठी!; कन्नडच्या घटनेने खळबळ
विहिरीत पडून १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू, पिशोर येथील दुर्दैवी घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software