पोलीस पाठलाग करत असल्याचे पाहून चोरट्यांनी कार सोडून काढला पळ..., वैजापूर तालुक्यातील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

वैजापूर  (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : पोलीस पाठलाग करत असल्याचे पाहून चोरट्यांनी कार जागेवरच सोडून अंधारात पळ काढला. वैजापूर पोलिसांनी पांढरी स्विफ्ट कार (एचआर ९३ बी ६५५७) जप्त केली. वेगवेगळी पथके तयार करून पळालेल्या तिन्ही चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. एटीएम सेंटर फोडणारी ही टोळी असल्याचा संशय पोलिसांना आहे.

पांढऱ्या स्विफ्ट कारमधून चोरटे जात असल्याची माहिती वैजापूर पोलिसांना मिळाली. रेल्वेस्टेशन रोडवरील उर्दू शाळेजवळील पाटाच्या रस्त्याने कार गेल्याचे कळताच पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी लगेचच सहकाऱ्यांसह धाव घेतली. पोलीस व नागरिक आपला पाठलाग करत असल्याचे पाहून चोरटे गोंधळले. त्यांनी कार सुसाट आडवाटेकडे वळवली. पोलीस मागेच होते. पोलीस पिच्छा सोडत नसल्याचे पाहून चोरट्यांनी आघूर शिवारात कार सोडून देत अंधारात पळ काढला. चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट

Latest News

समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहराजवळील गांधेली येथे मंगळवारी (१० मार्च) रात्री ९ च्या सुमारास हभप निवृत्ती...
सोशल मीडियातून ओळख, प्रेम, ४ महिने सहवास, नंतर जातीवरून युवतीला लाथाबुक्क्या!; प्रियकरासह त्याची आई, दोन बहिणी, भावाविरुद्ध ‘ॲट्रॉसिटी’, पाचोडची घटना
भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना
नापिकी, कर्जबाजारीपणाचे आणखी २ बळी!; सिल्लोड, कन्नड तालुक्यातील २ शेतकऱ्यांनी कवटाळले मरण!!
फीट येऊन चुलीवर पडल्याने महिलेचा मृत्यू, सातारा परिसरातील संत ज्ञानेश्वरनगरातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software