स्वयंपाक करताना साडीने पेट घेतला, ३३ वर्षीय महिलेचा जळून मृत्यू, सिल्लोडची दुर्दैवी घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : आमठाणा (ता. सिल्लोड) येथे घरात स्वयंपाक करताना साडीला आग लागून ३३ वर्षीय महिला भाजली गेली होती. छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा बुधवारी (१९ नोव्‍हेंबर) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मृत्यू झाला.

दुर्गा कैलास दिवटे (वय ३३, रा. आमठाणा) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. ११ नोव्हेंबरला दुर्गा स्वयंपाक करत असताना त्यांच्या साडीला अचानक आग लागली. यात त्या गंभीररीत्या भाजल्या गेल्या. कुटुंबीयांनी त्यांना आधी सिल्लोडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, नंतर छत्रपती संभाजीनगरला घाटी रुग्णालयात नेले होते. ८ दिवस त्यांनी मृत्यूशी झुंज दिली. मात्र बुधवारी सायंकाळी मृत्यू झाला. सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी घटनेची नोंद घेतली. अधिक तपास पोलीस अंमलदार अनंत जोशी करीत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ

Latest News

छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहर व जिल्ह्यात मुस्लिम बांधवांची संख्या मोठी आहे. मुस्लिम बांधवांसाठी पवित्र मास म्हणून ओळखल्या...
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
जमिनीच्या वादातून सेवानिवृत्त वनअधिकाऱ्याचे भरदिवसा अपहरण करून लुटले, ७ तास धरले वेठीस, छत्रपती संभाजीनगरची खळबळजनक घटना
सिल्लोडजवळ २ भीषण अपघात : अज्ञात वाहनाची कारला मागून धडक, एकाचा मृत्‍यू; मका नेणारा ट्रक उलटून चालक जखमी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software