छ. संभाजीनगरच्या सराफावर कायगावमध्ये गोळीबार!; दागिन्यांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्‍न, सराफा मुंडलिक यांनी वाचा कसे त्‍यांचे प्रयत्‍न ठरवले असफल...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

गंगापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : कायगाव (ता. गंगापूर) येथील मुंडलिक ज्वेलर्समध्ये मंगळवारी (२३ सप्‍टेंबर) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास दरोडेखोरांनी थरार घडवला. सराफावर गोळीबार करून लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र सराफाने प्रतिकार केल्याने त्यांचे प्रयत्‍न अपयशी झाले. दोन गोळ्या झाडूनही सतीश मुंडलिक (रा. छत्रपती संभाजीनगर) यांना त्‍या लागल्या नाहीत. दरोडखोरांच्या या कृत्‍यामुळे तालुक्‍यात खळबळ उडाली आहे.

कायगाव येथे मुंडलिक ज्वेलर्स असून, त्याचे मालक सतीश मुंडलिक आहेत. ते छत्रपती संभाजीनगरला राहतात. दुकान बंद करून छत्रपती संभाजीनगरला जायचे असल्याने आवराआवर करून दुकानातील दागिने एका बॅगमध्ये त्यांनी भरले. त्याच वेळी अचानक तिघे जण पल्सर दुचाकीवरून आले. त्यातील दोघांनी दागिन्यांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. मुंडलिक यांनी त्यांना जोरदार प्रतिकार केला. तिघांपैकी एकाला सतीश यांनी जोरात दाबून धरले. त्यामुळे दरोडेखोर चिडले. त्यांनी सतीश यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या.

सतीश यांनी एकाला पकडलेले असल्याने साथीदाराला गोळी लागण्याच्या भीतीने त्यांनी सतीश यांच्यापासून बाजूला गोळ्या झाडल्या. त्यामुळे सतीश बालंबाल बचावले. त्याचवेळी सतीश हे जोरजोरात ओरडत असल्याने आणि गोळीबाराच्या आवाजाने नागरिक धावून आले. त्यामुळे दरोडेखोरांनी बॅग तिथेच सोडून पळ काढला. माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नीलेश पालवे, पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड, पोलीस उपनिरीक्षक औदुंबर लाटे, संतोष झोरे यांनी घटनास्‍थळी भेट दिली. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्याआधारे दरोडेखोरांचा कसून शोध घेतला जात आहे. गंगापूर पोलिसांनी दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

विधवेचे केस धरून ओढले, धक्काबुक्की, पुढे युवकाची हिंमत वाढतच गेली... वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

Latest News

विधवेचे केस धरून ओढले, धक्काबुक्की, पुढे युवकाची हिंमत वाढतच गेली... वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना विधवेचे केस धरून ओढले, धक्काबुक्की, पुढे युवकाची हिंमत वाढतच गेली... वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विधवा महिलेचे डोक्याचे केस धरून ओढत, धक्काबुक्की करून युवकाने तिची सोन्याची पोत घेऊन पळ...
कॉपीमुक्त अभियान सामूहिक जबाबदारी, जिल्हाधिकारी स्वामी यांची स्‍पष्ट सूचना
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रशासनाची काय तयारी, मतदारांपासून बंदोबस्तापर्यंत, उमेदवारांना सूचना काय... जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच सांगितले... ही बातमी प्रत्येकाने आवर्जुन वाचा...
असा आला, असा निघून गेला...CCTV मध्ये हा कोण दिसला?, वाळूज महानगरातील घटना
आत मतमोजणी, बाहेर अलोट गर्दी, मानली संधी अन्‌ चोरट्यांनी कमावले १० लाख!; गरवारे स्टेडियमवर सोन्याचे दागिने, रोकडवर मारला हात!!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software