- News
- जिल्हा न्यूज
- स्वदेशीला प्राधान्य द्या, आत्मनिर्भर व्हा : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे आवाहन, गंगापूरमध्ये भव्य
स्वदेशीला प्राधान्य द्या, आत्मनिर्भर व्हा : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे आवाहन, गंगापूरमध्ये भव्य हिंदू संमेलन
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
गंगापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : समानता केवळ ओठात नको, कृतीत हवी आहे. त्यासाठी सगळ्या जातीपातीतील आपले मित्र केले पाहिजे. समाजात सद्भावना असायला हवी. कुटुंबात आपल्या संस्कार, परंपरांची चर्चा करायला हवी. जगताना पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी केली पाहिजे. विदेशी वस्तूंचा वापर करण्यापेक्षा स्वदेशीला प्राधान्य दिले पाहिजे. आपल्याला आत्मनिर्भर व्हायचे आहे. आत्मनिर्भर झालो तर आपल्या शक्तीला अर्थ राहील, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी गंगापूरमध्ये आज, १६ जानेवारीला सायंकाळी केले.

कोण काय म्हणाले?
ह.भ.प. गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मान अपमान सहन करत शंभर वर्षांचा प्रवास केला आहे. जातीपातीत विभागलेल्या हिंदू समाजाचे त्यांनी संघटन केले. आता हिंदू समाजाने सामाजिक एकोपा ठेवून वाटचाल करावी.
ह.भ.प. गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज : आपल्याला संघटित रहावे लागेल. आपल्या समाजातील जातीवादाचे समूळ उच्चाटन करावे लागेल.
जगद्गुरू श्रीश्री १००८ स्वामी शांतिगिरीजी महाराज : समाजाने आपल्या संस्कृतीचे आचरण करणे आवश्यक आहे. विदेशी संस्कृतीच्या आहारी गेल्यामुळे आपली पिढी चुकीच्या मार्गाला जात आहे. आपले कुटुंब सुसंस्कृत करा, ज्यामुळे आपला समाज सुरक्षित होईल.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
By District Correspondent
सिल्लोडजवळ २ भीषण अपघात : अज्ञात वाहनाची कारला मागून धडक, एकाचा मृत्यू; मका नेणारा ट्रक उलटून चालक जखमी
By District Correspondent
विदेशी नागरिकाला अवैध घर भाड्याने दिले; पोलिसांनी घरमालकावर दाखल केला गुन्हा
By District Correspondent
Latest News
17 Feb 2026 13:14:02
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहर व जिल्ह्यात मुस्लिम बांधवांची संख्या मोठी आहे. मुस्लिम बांधवांसाठी पवित्र मास म्हणून ओळखल्या...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई

