पैठण हादरले : अवघ्या १२ वर्षांच्या मुलीने घरात घेतला गळफास, कारण काय...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : पिंपळवाडी पिराची (ता. पैठण) येथे १२ वर्षीय मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ही घटना शुक्रवारी (१९ सप्‍टेंबर) सायंकाळी सव्वा पाचला समोर आली. सोफिया अमजद शेख असे आत्‍महत्‍या केलेल्या मुलीचे नाव आहे.

सोफियाचे आई-वडील शुक्रवारी सकाळीच कामासाठी बाहेर गेले होते. सायंकाळी तिने राहत्या घरातील खोलीत साडीच्या साहाय्याने अँगलला गळफास घेतला. आई, वडील काम आटोपून परतल्यानंतर ही बाब समोर आला. माहिती मिळताच पैठण एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सोफियाच्या पश्चात आई, वडील, एक बहीण असा परिवार आहे. तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार कर्तारसिंग सिंगल करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट

Latest News

समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहराजवळील गांधेली येथे मंगळवारी (१० मार्च) रात्री ९ च्या सुमारास हभप निवृत्ती...
सोशल मीडियातून ओळख, प्रेम, ४ महिने सहवास, नंतर जातीवरून युवतीला लाथाबुक्क्या!; प्रियकरासह त्याची आई, दोन बहिणी, भावाविरुद्ध ‘ॲट्रॉसिटी’, पाचोडची घटना
भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना
नापिकी, कर्जबाजारीपणाचे आणखी २ बळी!; सिल्लोड, कन्नड तालुक्यातील २ शेतकऱ्यांनी कवटाळले मरण!!
फीट येऊन चुलीवर पडल्याने महिलेचा मृत्यू, सातारा परिसरातील संत ज्ञानेश्वरनगरातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software