मंत्री अतुल सावे शेतकऱ्यांच्या बांधावर; त्वरित पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : नुकसानीचा पंचनामा होत नसल्याने सोयगावमध्ये शेतकऱ्याचा बळी गेल्यानंतर अखेर मंत्री अतिवृष्टीग्रस्तांचे अश्रू पुसायला सरसावले असून, मंत्री अतुल सावे यांनी वैजापूर तालुक्‍यातील वीरगाव, भग्गाव, कापूस वडगाव (ता. वैजापूर) या परिसरात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी आज, २४ सप्टेंबरला केली. सावे बांधावर गेले आणि शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी प्रशासनाला पंचनामे करण्याचे निर्देश दिले.

उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड, तहसीलदार सुनिल सावंत, तालुका कृषी अधिकारी व्यंकट ठक्के, गटविकास अधिकारी श्रीकृष्ण वेणीकर तसेच ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी तसेच सहाय्यक कृषी अधिकारी तसेच तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी आणि गट विकास अधिकारी व सर्व विभागांचे प्रमुख होते. वीरगाव परिसरात मका पिकाचे मोठे नुकसान झाले असून भग्गाव परिसरात सोयाबीन, ऊस पिकाचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनातर्फे भरीव मदत देण्याची ग्वाही सावे यांनी दिली. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा दिलासाही दिला.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट

Latest News

समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहराजवळील गांधेली येथे मंगळवारी (१० मार्च) रात्री ९ च्या सुमारास हभप निवृत्ती...
सोशल मीडियातून ओळख, प्रेम, ४ महिने सहवास, नंतर जातीवरून युवतीला लाथाबुक्क्या!; प्रियकरासह त्याची आई, दोन बहिणी, भावाविरुद्ध ‘ॲट्रॉसिटी’, पाचोडची घटना
भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना
नापिकी, कर्जबाजारीपणाचे आणखी २ बळी!; सिल्लोड, कन्नड तालुक्यातील २ शेतकऱ्यांनी कवटाळले मरण!!
फीट येऊन चुलीवर पडल्याने महिलेचा मृत्यू, सातारा परिसरातील संत ज्ञानेश्वरनगरातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software