- News
- जिल्हा न्यूज
- खुलताबाद, वैजापूर, गंगापूरचे उपनगराध्यक्ष निवडले; नवनाथ बारगळ, शेख अकील, अमोल जगताप यांची निवड
खुलताबाद, वैजापूर, गंगापूरचे उपनगराध्यक्ष निवडले; नवनाथ बारगळ, शेख अकील, अमोल जगताप यांची निवड
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर, वैजापूर आणि खुलताबादच्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडी शुक्रवारी (१६ जानेवारी) झाल्या. खुलताबादमध्ये राजकीय व्टिस्ट घडला. काँग्रेसच्या पाठिंब्यावर चक्क भाजपचा उपनगराध्यक्ष झाला.
अजित पवार गटाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी खुलताबादच्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपला पाठिंबा दिला. त्यामुळे भाजपचे उमेदवार नवनाथ बारगळ यांचा दोन मतांनी विजय झाला. भाजपच्या वतीने बारगळ तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने (अजित पवार गट) योगेश फुलारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला. हात उंचावून मतदान घेण्यात आले. काँग्रेसच्या ४ सदस्यांनी बारगळ यांना पाठिंबा दिला. सभागृहातील संख्याबळाच्या आधारे स्वीकृत सदस्यपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगराध्यक्ष अॅड. एस. एम. कमर, भाजपचे परसराम बारगळ यांची निवड करण्यात आली. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अॅड. अनिल नलावडे यांनी काँग्रेस पक्षाच्या ४ सदस्यांना ‘व्हीप’ जारी केला होता. मात्र चारही सदस्यांनी उघडपणे भाजपला पाठिंबा दिला. या चार सदस्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येणार आहे. खुलताबादचे नगराध्यक्ष काँग्रेसचे सय्यद आमेर पटेल असून, नगर परिषदेच्या सभागृहात अजित पवार गटाचे ९, भाजपचे ७ तर काँग्रेसचे ४ सदस्य आहेत.
वैजापूरच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) शेख रियाज अकील यांची निवड झाली. नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया झाली. भाजपतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या विशाल संचेती यांचा अर्ज शहर विकास आघाडीची शिफारस नसल्याने अवैध ठरला. स्वीकृत सदस्य म्हणून प्रकाश चव्हाण, प्रशांत कंगले (शहर विकास आघाडी) आणि संजय बोरनारे (शिंदे गट) यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
गंगापूरच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) अमोल जगताप यांची बिनविरोध निवड झाली. स्वीकृत सदस्य म्हणून सुवर्णा संजय जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस) आणि डॉ. शीतल गंगवाल (भाजप) यांची वर्णी लागली आहे. नगराध्यक्ष संजय जाधव यांच्या अध्यक्षतेखालील सभेत राजकीय समीकरणे जुळवून सर्व निवडी बिनविरोध करण्यात आल्या. २० सदस्य असलेल्या पालिकेत आता ११ निर्वाचित आणि २ स्वीकृत अशा एकूण १३ महिला सदस्य झाल्या आहेत.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
वैजापूर बाजार समिती भाजपच्या ताब्यात, सभापतीपदी कल्याण दांगोडे बिनविरोध
By City News Desk
Latest News
04 Mar 2026 09:21:01
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्ह्यातून ५ अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरातील ३...

