जोगेश्वरीत बिबट्याचा ‘थरथराट’; शेतीकामे ठप्प, शेतकरी रात्री काढताहेत जागून... 

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : वाळूज एमआयडीसीतील जोगेश्वरीत बिबट्याचा मुक्तसंचार होत असल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी बिबट्या पाहिला. एका कारचालकाच्या कॅमेऱ्यातही तो कैद झाला. या बिबट्याचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांना भयमुक्त करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

१० दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे रात्री आणि दिवसाही शेतीकामांवर परिणाम झाला आहे. जनावरांच्या काळजीपोटी शेतकऱ्यांनी रात्री जागून काढाव्या लागत आहेत. शेतकरी जयश्री रामनाथ दुबिले (वय ४५, रा. बालाजीनगर, जोगेश्वरी) या तिन्ही मुलांसह स्वतःच्या मळ्यात राहतात. त्यांनी सांगितले, की रविवारी (६ ऑक्टोबर) रात्री सुमारे ८.३० वाजता घरासमोर कुत्रे भुंकत असल्याने दरवाजात उभी राहून बाहेर पाहिले असता जोगेश्वरी गावाकडून रामराईकडे जाणाऱ्या रस्त्यावर बिबट्या दिसला. मी लगेच दरवाजा लावून घेतला. जयश्री यांचा मुलगा नीलेश दुबिले (वय २२) याने गावातून फटाके आणले तर ऋषिकेश दुबिले (वय २४) याने ते रोडवर वाजवले. आवाज ऐकून परिसरातील २५ ते ३० ग्रामस्थ एकत्र जमले आणि सर्वांनी सावध राहण्याचे ठरले.

रात्री सुमारे ११ वाजता वाळूज पोलिस ठाण्यातील पथक घटनास्थळी आले. मात्र, ही हद्द आमची नाही, असे सांगून ते निघून गेल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. दुसऱ्या दिवशी वन विभागाने पाहणी केली असल्याचे त्यांनी सांगितले. जनार्दन काजळे, नारायण काजळे, उत्तम काजळे, नवनाथ नरवडे, सुदाम नरवडे, प्रभाकर नरवडे आणि संजय काजळे या शेतकऱ्यांनी बिबट्यामुळे निर्माण झालेली दहशत व्यक्त केली. जनार्दन काजळे यांनी सांगितले की, गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दररोज कुत्रे भुंकले की आम्ही फटाके वाजवतो. संजय काजळे यांनी सांगितले, की आम्हाला दररोज फटाके वाजवावे लागतात. जीव मुठीत घेऊन जनावरांना चारापाणी व दूध काढायला जावे लागते. वनविभागाने याकडे गांभीर्याने पाहून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी त्यांनी केली. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

टवाळखोरांनी हद्दच केली... शाळेबाहेरच दहावीतील विद्यार्थिनीची छेड, भावाने जाब विचारल्याने फायटरने केले रक्तबंबाळ!; वैजापूर तालुक्यातील खंडाळ्याची संतापजनक घटना

Latest News

टवाळखोरांनी हद्दच केली... शाळेबाहेरच दहावीतील विद्यार्थिनीची छेड, भावाने जाब विचारल्याने फायटरने केले रक्तबंबाळ!; वैजापूर तालुक्यातील खंडाळ्याची संतापजनक घटना टवाळखोरांनी हद्दच केली... शाळेबाहेरच दहावीतील विद्यार्थिनीची छेड, भावाने जाब विचारल्याने फायटरने केले रक्तबंबाळ!; वैजापूर तालुक्यातील खंडाळ्याची संतापजनक घटना
वैजापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वैजापूर तालुक्यातील खंडाळा जिल्हा परिषद शाळेच्या आवारात दहावीतील विद्यार्थिनीची टवाळखोरांनी छेड काढली. याचा जाब तिच्या...
अवैध सावकारी गुंडांनी बांधकाम व्यावसायिकाचे जगणे केले अवघड, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल, दोघांना अटक, ५ लाखांच्या बदल्यात १६ लाख गेले, अडीच एकर जमीन हडपली, ॲट्रॉसिटी, मुलाच्या अपहरणाच्या धमक्या..., छत्रपती संभाजीनगर शहरातील धक्कादायक प्रकार उघड
समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट
सोशल मीडियातून ओळख, प्रेम, ४ महिने सहवास, नंतर जातीवरून युवतीला लाथाबुक्क्या!; प्रियकरासह त्याची आई, दोन बहिणी, भावाविरुद्ध ‘ॲट्रॉसिटी’, पाचोडची घटना
भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software