गोरक्षक, पोलिसांनी वाचवली ८ गोवंश जनावरे, सिल्लोड तालुक्यात कारवाई

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : अवैध कत्तलीसाठी ८ बैल आयशर वाहनातून निर्दयीपणे घेऊन जाणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळण्यात सिल्लोड ग्रामीण पोलिसांना यश आले. यासाठी गोरक्षकांनी पुढाकार घेत वाहने थांबवून ठेवले होते. ही कारवाई सिल्लोड तालुक्यातील भराडी येथे गुरुवारी (२५ डिसेंबर) रात्री करण्यात आली.

इरफान शेख मेहमूद (वय ३७, रा. ईदगाहनगर सिल्लोड), इम्रान शेख हनिफ (वय ३०, रा. बोरगाव सारवणी ता. सिल्लोड) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी (२५ डिसेंबर) रात्री साडेअकराच्या सुमारास पोलिसांना गोरक्षक नैना राजपूत यांनी माहिती दिली होती, की बोरगाव बाजार येथे गोवंश जनावरे कापण्यासाठी एका गोठ्यामध्ये ठेवलेले आहेत. त्यानंतर पोलिसांनी लगेचच बोरगाव बाजारकडे धाव घेतली. मात्र भराडी गावातील बसथांब्यावरच गोरक्षकांनी आयशर वाहन थांबवल्याचे त्यांना दिसले. पोलिसांनी आयशर वाहनाचा चालक इरफान आणि त्याच्यासोबत इम्रानला ताब्यात घेतले. आयशर वाहनात ८ बैल अत्यंत निर्दयीपणे बांधून नेण्यात येत होते. यात ६ पांढरे तर २ तपकिरी बैल होते. पोलिसांनी वाहन जप्त केले आणि बैलांना गोशाळेत पाठविण्याची व्यवस्था केली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट

Latest News

समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहराजवळील गांधेली येथे मंगळवारी (१० मार्च) रात्री ९ च्या सुमारास हभप निवृत्ती...
सोशल मीडियातून ओळख, प्रेम, ४ महिने सहवास, नंतर जातीवरून युवतीला लाथाबुक्क्या!; प्रियकरासह त्याची आई, दोन बहिणी, भावाविरुद्ध ‘ॲट्रॉसिटी’, पाचोडची घटना
भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना
नापिकी, कर्जबाजारीपणाचे आणखी २ बळी!; सिल्लोड, कन्नड तालुक्यातील २ शेतकऱ्यांनी कवटाळले मरण!!
फीट येऊन चुलीवर पडल्याने महिलेचा मृत्यू, सातारा परिसरातील संत ज्ञानेश्वरनगरातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software