फुल प्लॅन करून आले, पण पोलिसांना कळले, हत्‍यारांसह आवळल्या दरोडेखोरांच्या मुसक्या!, वैजापूरमध्ये धडाकेबाज कारवाई

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

वैजापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : दरोडा टाकण्याच्या प्रयत्‍नात असलेल्या सहापैकी दोघांच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. चार जण पळून जाण्यात यशस्वी झाले. शुक्रवारी (१२ सप्‍टेंबर) रात्री वैजापूरजवळ ही कारवाई करण्यात आली.

अमोल साईराम गायकवाड (वय २७) व गोविंद निवृत्ती पवार (वय २०, दोघेही रा. बेलगाव, ता. वैजापूर) अशी संशयितांची नावे आहेत. मुंबई- नागपूर हायवेलगत बेलगाव शिवारात एका कारमध्ये काहीजण दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांना मिळाली होती. त्यांनी सहकाऱ्यांसह लगेचच वैजापूर गाठले.

कारमध्ये बसलेल्यांवर हल्लाबोल केला असता लक्ष्मण ऊर्फ लखन नामदेव जगताप व विक्रम ऊर्फ विकी बाळासाहेब बोरगे (दोघेही रा. भग्गाव, ता. वैजापूर) व दोन अनोळखी असे चौघे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. संशयितांच्या ताब्यातून गावठी कट्ट्यासह अन्य घातक शस्त्रे व दरोडा टाकण्याचे साहित्य असा १ लाख ५९ हजार ४५० रुपयांचा जप्त करण्यात आला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

आ. सत्तार हाजीर हो, सिल्लोड न्यायालयाने काढले आदेश, निवडणुकीत मतदारांना धमकावल्याचा आरोप

Latest News

आ. सत्तार हाजीर हो, सिल्लोड न्यायालयाने काढले आदेश, निवडणुकीत मतदारांना धमकावल्याचा आरोप आ. सत्तार हाजीर हो, सिल्लोड न्यायालयाने काढले आदेश, निवडणुकीत मतदारांना धमकावल्याचा आरोप
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार पुन्हा गोत्यात येण्याची चिन्हे आहेत. विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या शेवटच्या जाहीर...
भरधाव पिकअप वाहनाने स्कुटीला उडवले, मायलेकी जखमी, छत्रपती संभाजीनगर शहराजवळील घटना
सत्यनारायण पूजेसाठी निघालेल्या पुजाऱ्याचा दुचाकी घसरून मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
झाडावरून पडून युवकाचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
शिंदे गटाला सोबत घ्यावेच लागणार, पण ‘अटींचा’ भडीमार नको म्हणून भाजपच्या खेळ्या सुरू..., शहर-जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे काय म्हणाले...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software