- News
- जिल्हा न्यूज
- गंगापूरचे माजी आमदार अण्णासाहेब माने, पुत्र संतोषसह शिंदे गटात दाखल, आ. बंब यांच्यासाठी धोक्याची घंट...
गंगापूरचे माजी आमदार अण्णासाहेब माने, पुत्र संतोषसह शिंदे गटात दाखल, आ. बंब यांच्यासाठी धोक्याची घंटा
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
गंगापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : गंगापूरचे माजी आमदार अण्णासाहेब माने यांनी पुत्र संतोष माने यांच्यासह मुंबई येथील दसरा मेळाव्यात शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला आहे. गेल्या काही दिवसांपासून पिता-पुत्र राजकारणापासून अलिप्त होते. आता शिंदे गटात येऊन त्यांनी पुन्हा राजकीय मैदानात उडी घेतली आहे. यापूर्वी गंगापूरचे माजी आमदार कैलास पाटील शिंदे गटात दाखल झाले आहेत. आता माने पिता-पुत्र आले आहेत. त्यामुळे शिंदे गटाचे भविष्यातील राजकीय आडाखे काय असतील, याबद्दल चर्चा घडून येत आहेत. भाजपचे आ. प्रशांत बंब यांच्यासाठी ही धोक्याची घंटा वाजू लागली आहे.
गंगापूरमध्ये शिंदे गटाचे अस्तित्व नावालाच आहे. अशा स्थितीत दोन माजी आमदार शिंदे गटात दाखल झाल्याने पक्ष वाढीसाठी त्यांच्याकडून प्रामाणिक प्रयत्न होणे गरजेचे आहे. मूळ शिवसैनिकांना सोबत घेत शिंदे गटाचे वर्चस्व मतदासंघात निर्माण करणे कैलास आणि माने पिता-पुत्रासाठी आव्हान असणार आहे. त्यांनी हे आव्हान पेलण्यात उत्साह दाखवला तर आ. बंब यांच्यासाठी मात्र धोक्याची घंटा वाजणार आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
मंदिरात गुप्तपणे दान करा ‘या’ ५ गोष्टी! तुमची संपत्ती वाढते...
By City News Desk
आ. सत्तार हाजीर हो, सिल्लोड न्यायालयाने काढले आदेश
By City News Desk
झाडावरून पडून युवकाचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
By City News Desk
Latest News
18 Jan 2026 14:09:04
जगभरात मधुमेह हा आता सामान्य आजार बनत चालला आहे. भारतात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. मधुमेहामुळे अनियंत्रित साखरेची पातळी वाढते,...

