बिडकीनमध्ये भीषण आग, भाजीमंडईतील फुटवेअरचे दुकान खाक, ४ लाखांच्या नुकसानीचा अंदाज

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : बिडकीन येथील भाजी मंडईतील कैलास कवडे यांच्या फुटवेअर दुकानाला शुक्रवारी (५ डिसेंबर) सायंकाळी सहाच्या सुमारास भीषणआग लागली. आगीत चपला, बुटांसह इतर साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. साडेतीन ते चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे कवडे यांनी सांगितले.

कैलास कवडे (वय २३) बिडकीनच्या काळे गल्लीत राहतात. दुकानामागे ठेवलेले रिकामे कागदी खोके, चप्पल, बुटांना शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता आहे. पाच ते दहा मिनिटांत आगीने दुकानाला वेढले. भाजी विक्रेते व व्यापाऱ्यांनी मिळेल तिथून बकेटने पाणी आणून आग आटोक्यात आणली. दुकानाच्या बाजूलाच दवाखाना, मेडिकल, किराणा, फोटोशॉप, कापड दुकानदार, छोटे भाजी विक्रेते बसलेले होते. आग वाढण्याच्या भीतीने सर्वांनी जिवाच्या आकांताने आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. भाजी मंडईतील अरुंद रस्त्यामुळे अग्निशामक दलाचा बंब येण्यास उशीर झाल्याचे स्थानिकांनी सांगितले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

कल्पनाची ‘तोतयेगिरी’; ७ लाख ८५ हजार देणारा रियल इस्टेट एजंट दत्तात्रय शेटेला अटक!

Latest News

कल्पनाची ‘तोतयेगिरी’; ७ लाख ८५ हजार देणारा रियल इस्टेट एजंट दत्तात्रय शेटेला अटक! कल्पनाची ‘तोतयेगिरी’; ७ लाख ८५ हजार देणारा रियल इस्टेट एजंट दत्तात्रय शेटेला अटक!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : तोतया आयएएस अधिकारी कल्पना त्र्यंबकराव भागवत (वय ४५, रा. चिनारगार्डन, पडेगाव, छत्रपती संभाजीनगर) हिच्या...
सेंट्रल नाक्यावर नायलॉन मांजाने चिरला ३ वर्षीय चिमुकल्याचा गळा!
राजनगरमध्ये मध्यरात्री हल्लकल्लोळ! टवाळखोराने जाळल्या ५ दुचाकी!!
हर्सूल टी पॉइंटवर हिट ॲन्ड रन; दुचाकीस्वाराला उडवून कार पसार... 
सराफा व्यापाऱ्यावर ४ टवाळखोरांचा प्राणघातक हल्ला, दारू पिण्यासाठी पैसे मागत लाकडी दांड्याचे वार, व्यापारी जखमी, हडको एन ११ मधील खळबळजनक घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software