गंगापूरच्या तांदूळवाडीत सशस्त्र दरोडा, दरोडेखोरांनी क्रूरतेच्या सीमा केल्या पार, दिसेल त्याच्यावर कुऱ्हाडीचे घाव, सव्वा दोन लाखांची लूट, ४ जखमी

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

गंगापूर (गणेश म्हैसमाळे : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : गंगापूर तालुक्यातील तांदूळवाडी शिवारातील शेतकऱ्याच्या घरावर सशस्त्र दरोडा घालून २ लाख ३१ हजार रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी लुटून नेला. ही घटना आज, १७ नोव्हेंबरच्या पहाटे दोनच्या सुमारास घडली.

पोपट जनार्धन राशनकर (वय ३५, रा. तांदूळवाडी) यांच्या तक्रारीवरून शिल्लेगाव पोलिसांनी ३ ते ४ दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दरोडेखोरांनी लुटलेल्या ऐवजात पोपट यांची पत्नी मनिषा यांच्या गळ्यातील दोन ग्रॅमचे मनी मंगळसूत्र, कपाटातील एक तोळ्याचा सोन्याचा नेकलेस, कानातील २ झुंबर, एक तोळ्याची सोन्याची पोत, ६ ग्रॅमचे मनी मंगळसूत्र, २ ग्रॅमची सोन्याची नथ (किंमत २ लाख १२ हजार), ५ हजार रुपये रोख असा एकूण २ लाख ३१ हजार रुपयांचा ऐवज  दरोडेखोरांनी लुटला. दरोडेखोरांनी दहशत निर्माण करण्यासाठी कुऱ्हाड आणि लाकडी काठ्यांनी राशनकुमार कुटुंबीयांना बेदम मारहाण केली.

यात पोपट राशनकर, त्यांची पत्नी मनिषा, आई जनाबाई, वडील हिरामण हे गंभीर जखमी झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत दरोडेखोरांना अटक करण्यात पोलिसांना यश आले नाही. अधिक तपास पोलीस निरीक्षक चाऊस करत आहेत. घटनास्‍थळी उपविभागीय अधिकारी पालवे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजपूत, सहायक पोलीस निरीक्षक इंगळे यांनी भेट देऊन पाहणी केली. श्वान पथक व ठसेतज्‍ज्ञांनाही घटनास्थळी पाचारण केले होते. तीन -चार दरोडेखोर पहाटे दोनला अचानक दार तोडून घरात घुसले. त्यांनी राशनकर कुटुंबीयांना लाकडी दांड्यासह कुऱ्हाडीने डोक्यात, हाता-पायांवर मारहाण करून जखमी केले. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट

Latest News

समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहराजवळील गांधेली येथे मंगळवारी (१० मार्च) रात्री ९ च्या सुमारास हभप निवृत्ती...
सोशल मीडियातून ओळख, प्रेम, ४ महिने सहवास, नंतर जातीवरून युवतीला लाथाबुक्क्या!; प्रियकरासह त्याची आई, दोन बहिणी, भावाविरुद्ध ‘ॲट्रॉसिटी’, पाचोडची घटना
भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना
नापिकी, कर्जबाजारीपणाचे आणखी २ बळी!; सिल्लोड, कन्नड तालुक्यातील २ शेतकऱ्यांनी कवटाळले मरण!!
फीट येऊन चुलीवर पडल्याने महिलेचा मृत्यू, सातारा परिसरातील संत ज्ञानेश्वरनगरातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software