आ. सत्तारांनंतर आ. बोरनारेंचेही घराणेशाहीवर पाऊल!; बंधू संजय बोरनारेंनी भरला नगराध्यक्षपदासाठी अर्ज

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

वैजापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : सिल्लोडचे आ. अब्दुल सत्तार यांच्यानंतर आता वैजापूरचे आ. संजय बोरनारे यांनीही घराणेशाहीवर पाऊल ठेवले आहे. त्यांचे बंधू संजय बोरनारे यांनी वैजापूर नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांत नाराजीचे वातावरण आहे.

नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या चौथ्या दिवशी गुरुवारी (१३ नोव्‍हेंबर) संजय बोरनारे यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल केली. त्यांच्यासोबत आ. रमेश बोरनारे, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर उपस्थित होते. वैजापूरमध्ये नगरसेवकपदासाठी १७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

पैठणमध्ये नगराध्यक्षपदासाठी एक तर नगरसेवकपदासाठी ११ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. कन्नडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वाती कोल्हे यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरला असून, नगरसेवकपदासाठी संतोष कोल्हे यांच्यासह ६ जणांचे अर्ज आले. फुलंब्रीत नगराध्यक्षपदासाठी एका अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. उमेदवारांना सोमवारपर्यंत (१७ नोव्‍हेंबर) अर्ज भरता येणार आहे. अवघे ३ दिवस उरल्याने आता उमेदवारी अर्ज भरण्याची धामधूम चालणार आहे.

वैजापूरमध्ये शिंदे गट फोडतोय भाजप...
सिल्लोडमध्ये स्थानिक भाजप पूर्णपणे आ. सत्तारांविरुद्ध उभी ठाकली आहे. वैजापूरमध्ये आ. बोरनारे यांनी भाजपचे पदाधिकारी फोडून शिंदे गटात आणण्याची मोहीम हाती घेतल्याचे दिसून येते. नुकतेच काही भाजप पदाधिकारी त्यांनी शिंदे गटात आणले. त्यामुळे एकूणच युतीतच फोडाफोडी सुरू असल्याचे दिसून येते. याचा पक्षाच्‍या वरिष्ठ स्तरावर काय परिणाम होतो, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

भुमरे, बोरनारे, सत्तार, संजना जाधव यांच्यावर निवडणुकीची जबाबदारी
नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी शिंदे गटाने प्रभारींची नियुक्ती केली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शिंदे गटाला या निवडणुकीत विजयी करण्याची जबाबदारी कन्नडच्या आमदार संजना जाधव, पैठणचे आमदार विलास भुमरे, वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे, सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्यावर आहे.
 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ

Latest News

छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहर व जिल्ह्यात मुस्लिम बांधवांची संख्या मोठी आहे. मुस्लिम बांधवांसाठी पवित्र मास म्हणून ओळखल्या...
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
जमिनीच्या वादातून सेवानिवृत्त वनअधिकाऱ्याचे भरदिवसा अपहरण करून लुटले, ७ तास धरले वेठीस, छत्रपती संभाजीनगरची खळबळजनक घटना
सिल्लोडजवळ २ भीषण अपघात : अज्ञात वाहनाची कारला मागून धडक, एकाचा मृत्‍यू; मका नेणारा ट्रक उलटून चालक जखमी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software