दुचाकीवरून तोल जाऊन पडल्याने विवाहितेचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

कन्नड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : दुचाकीवरून तोल जाऊन पडल्याने ४३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही घटना सिल्लोड-कन्नड रस्त्यावरील साखरवेल (ता. कन्नड) फाट्याजवळ बुधवारी (१४ जानेवारी) सकाळी घडली.

कांचन विजय वाघ (वय ४३, रा. नाचनवेल, ता. कन्नड) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. कांचन वाघ या आपल्या मुलासोबत दुचाकीने कन्नडकडे जात होत्या. साखरवेल फाट्याजवळ अचानक तोल जाऊन पडल्याने त्यांच्या डोक्याला व छातीला मार लागून गंभीर जखमी झाल्या. नागरिकांनी मायलेकांना पिशोर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

मात्र कांचन यांची प्रकृती चिंताजनक असल्याने छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान दुपारी १:१५ वाजता त्यांचा मृत्यू झाला. कांचन यांच्या पश्चात पती, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. घटनेची नोंद पिशोर पोलिसांनी घेतली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार किरण गंडे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मागे न पाहताच रिव्हर्स घेणारा हायवा ठरला १८ वर्षीय मनस्वीचा काळ!; रुग्णालयात वडिलांना डबा घेऊन जात होती, चिकलठाण्याजवळील दुर्दैवी घटना

Latest News

मागे न पाहताच रिव्हर्स घेणारा हायवा ठरला १८ वर्षीय मनस्वीचा काळ!; रुग्णालयात वडिलांना डबा घेऊन जात होती, चिकलठाण्याजवळील दुर्दैवी घटना मागे न पाहताच रिव्हर्स घेणारा हायवा ठरला १८ वर्षीय मनस्वीचा काळ!; रुग्णालयात वडिलांना डबा घेऊन जात होती, चिकलठाण्याजवळील दुर्दैवी घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हायवाचालकाने रिव्हर्स घेताना मागे न पाहताच दुचाकीस्वार १८ वर्षीय तरुणीला चिरडले. उपचारादरम्यान घाटी रुग्णालयात...
ब्रिजवाडी जमीन गैरव्यवहार प्रकरणी विशेष तपास पथक गठीत, तीन महिन्यांत अहवाल सादर होणार, जिल्ह्यातील जमीन गैरव्यवहारांचीही होणार चौकशी
वाळूज महानगरात दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेचे गंठण हिसकावले!
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत औषध निरीक्षक गट-ब चाळणी परीक्षा २२ मार्चला; छत्रपती संभाजीनगरमध्ये ११ हजार ६४० उमेदवार देणार परीक्षा
विवाहितेच्या छळप्रकरणी बेगमपुरा पोलिसांत पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software