फुलंब्रीजवळ भीषण अपघात : टोलनाक्‍यावर ‘त्‍या लोकांची’ पैसे वसुली, अचानक स्कुटीसमोर आल्याने दिव्यांग अखिल गडबडले, ट्रकखाली आले...आजी-नातीचा जागीच मृत्‍यू, वडील गंभीर

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

फुलंब्री (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : भरधाव ट्रकने मागून जोरदार धडक दिल्याने स्कुटीवरील आजी आणि सहा वर्षांच्या नातीचा जागीच मृत्यू झाला, तर वडील गंभीर जखमी झाले. ही दुर्दैवी घटना फुलंब्री तालुक्यातील पाथ्रीजवळ रविवारी (१४ सप्‍टेंबर) दुपारी १२ च्या  सुमारास जळगाव राष्ट्रीय महामार्गावर घडली.

अख्तरबी सांडू शेख (वय ६०) व खनसा अखिल शेख (वय ६, दोघी रा. मिर्झा कॉलनी, सिल्लोड) अशी मृत्यू झालेल्यांची नावे अहेत. अखिल सांडू शेख (वय ४०, रा. मिर्झा कॉलनी, सिल्लोड) गंभीर जखमी आहेत. अखिल शेख दिव्यांग असून सेंट्रिंग व्यवसाय करतात. रविवारी तिघे तीनचाकी स्कूटीने (क्र. एमएच २०, डीआर ९९८२) सिल्लोडहून छत्रपती संभाजीनगरला जात होते. पाथ्रीजवळ नवीन टोलनाका झाला असून, तेथे काही जण वाहनधारकांकडून पैसे मागतात. हे पैसे मागणारे लोक अचानक स्कुटीसमोर आल्याने अखिल शेख गडबडले. त्याच वेळी मागून भरधाव आलेल्या ट्रकने त्यांच्या स्कूटीला उडवले.

यात अख्तरबी आणि खनसा ट्रकखाली आल्या, तर अखिल बाजूला फेकले गेल्याने बचावले. नागरिकांनी त्यांना घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्‍टरांनी आजी-नातीला मृत घोषित केले तर अखिल यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर ट्रकचालक वाहन सोडून पसार झाला. घटनेची नोंद वडोद बाजार पोलिसांनी केली आहे. शहरात चौकांत, रस्‍त्‍यांत, लग्न किंवा अन्य सार्वजनिक कार्यक्रमांत येऊन पोलीस आयुक्‍तांनी बंदी घातली आहे. मात्र जिल्ह्यातील टोलनाक्‍यांवर काही लोक सर्रास वाहनधारकांना अडवून पैसे मागत असतात. याच मुळे हा अपघात दोघींना प्राण गमवावे लागले. जिल्हा पोलिसांनीही शहर पोलीस आयुक्‍तांसारखा निर्णय घेऊन वाहनधारकांची या लोकांच्या जाचातून सुटका करावी, अशी मागणी होत आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Latest News

सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हर्सूल भागातील सुरेवाडीत दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. यात ३ जण गंभीर जखमी तर...
खबरदार... छत्रपती संभाजीनगरमध्ये नायलॉन मांजा वापराल तर... विकणाऱ्या दोघांना अटक, वापर करणाऱ्यांची माहिती देण्याचे आवाहन
'वाईट कमेंट वाचून त्यांना फटकारावेसे वाटत होते...; अभिनेत्री नेहा धुपियाची विशेष मुलाखत
Business News : भाजी विक्रेत्याने जिंकली ११ कोटींची पंजाब राज्य लॉटरी, त्याला किती उत्पन्न कर भरावा लागेल?
दोन वेगवेगळ्या घटना : वाळूज एमआयडीसीत दुचाकीसह शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू, घाटीजवळील गर्ल्स होस्टेलजवळ आढळला मृतदेह
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software