मकाच्या कणसांना कोंब फुटले, आक्रोश करत शेतकऱ्याने शेतातच गळफास घेतला!; कन्नड तालुक्यातील हृदयद्रावक घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

कन्नड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : अतिवृष्टीमुळे मका पिकाचे नुकसान झाले. मकाच्या कणसांना कोंब फुटल्याचे पाहून चिंताग्रस्त शेतकऱ्याने आक्रोश करत शेतातीलच आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्‍महत्‍या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (३१ ऑक्‍टोबर) सकाळी साडेअकराला कन्नड तालुक्यातील शफेपूर शिवारात समोर आली.

कृष्णा रावजी दवंगे (वय ४४,  रा. शफेपूर, ता. कन्नड) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. कृष्णा यांची पिशोर हद्दीलगत माळावर शफेपूर शिवारातील शेत गट क्र. १५६ मध्ये अडीच एकर शेती आहे. त्यांनी पैसे हातउसने घेऊन मकाची लागवड केली होती. अतिवृष्टीने नुकसान केले. त्यानंतरही सततच्या पावसाने कणसांना कोंब फुटले.  ते पाहून दवंगे चिंताग्रस्त झाले होते.

उसनवारी कशी फेडावी, कर्ज कसे कमी होणार, या चिंतेतून ते गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात गेले होते. शुक्रवारी सकाळी ते शेतात गेले. शेताला अखेरची चक्कर मारली आणि आंब्याच्या झाडाला गळफास घेतला. सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांच्यावर शफेपूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, चार भाऊ, भावजय असा परिवार आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट

Latest News

समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहराजवळील गांधेली येथे मंगळवारी (१० मार्च) रात्री ९ च्या सुमारास हभप निवृत्ती...
सोशल मीडियातून ओळख, प्रेम, ४ महिने सहवास, नंतर जातीवरून युवतीला लाथाबुक्क्या!; प्रियकरासह त्याची आई, दोन बहिणी, भावाविरुद्ध ‘ॲट्रॉसिटी’, पाचोडची घटना
भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना
नापिकी, कर्जबाजारीपणाचे आणखी २ बळी!; सिल्लोड, कन्नड तालुक्यातील २ शेतकऱ्यांनी कवटाळले मरण!!
फीट येऊन चुलीवर पडल्याने महिलेचा मृत्यू, सातारा परिसरातील संत ज्ञानेश्वरनगरातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software