अजिंठा येथून कॉलेज तरुणीला जबरदस्ती कारने फर्दापूरच्या लॉजवर नेत केला बलात्कार!, २५ वर्षीय सराईत गुन्हेगाराच्या कृत्‍याने छत्रपती संभाजीनगर हादरले!!

कन्नडमध्येही घरात घुसून झोपलेल्या २१ वर्षीय तरुणीवर बलात्कार

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : अजिंठा येथील कॉलेजमध्ये जात असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीला सराईत गुन्हेगाराने अडवून धमकावत कारमध्ये बसवून फर्दापूरच्या लॉजवर नेले आणि लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना रविवारी (२ नोव्‍हेंबर) समोर आल्याने खळबळ उडाली आहे. अजिंठा पोलिसांनी संशयित कृष्णा माणिकराव काळे (वय २५, रा. शिवना, ता. सिल्लोड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पीडित मुलगी अजिंठा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहते. ती शनिवारी (१ नोव्हेंबर) सकाळी आठला अजिंठा येथील कॉलेजला जात होती. अजिंठा येथे कृष्णा काळे याने तिला गाठले. तुझ्या वडिलांना मारून टाकेन, असे मुलीला धमकावले. बळजबरी कारमध्ये बसवून तिला फर्दापूर येथील एका लॉजवर नेले. तिथे धमकी देत तिच्यावर त्याने बलात्कार केला. वडिलांना मारण्याची धमकी दिल्याने मुलीने त्याने अत्याचार सहन केले.

शनिवारी सायंकाळी मुलगी कॉलेज सुटण्याच्या वेळेत घरी आली. त्यानंतर तिने घडलेला प्रकार आई-वडिलांना सांगितला. तिच्या आई-वडिलांनी लगेचच तिला घेऊन अजिंठा पोलीस ठाणे गाठले. अजिंठा पोलिसांनी गुन्हा दाखल करून कृष्णा काळेचा शोध सुरू केला आहे. वृत्त लिहीपर्यंत त्याला अटक नव्हती. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिनेशकुमार कोल्हे, सहायक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक एम. एम. सुडके तपास करत आहेत. कृष्णा काळे सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध यापूर्वी विविध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

घरात घुसून झोपलेल्या तरुणीवर बलात्कार
कन्नड तालुक्याही बलात्‍काराची आणखी एक घटना समोर आली आहे. कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहत्या घरात पुढील खोलीत झोपलेल्या २१ वर्षीय तरुणीवर युवकाने तोंड दाबून बलात्कार केला. नंतर तिच्या तोंडात विषारी औषध टाकले. कन्नड ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करून नराधमाला अटक केली आहे. मुलीने वडिलांसोबत येऊन धुळे शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र घटनास्थळ कन्नड तालुक्यात येत असल्याने हा गुन्हा कन्नड ग्रामीण पोलिसांक्‍डे वर्ग करण्यात आला. वाडीलाल बद्रीनाथ चव्हाण (रा. भिलदरी, ता. नागद) असे संशयिताचे नाव आहे. त्याला शनिवारी (१ नोव्हेंबर) पोलीस उपनिरीक्षक अमोल जाधव यांच्या पथकाने अटक केली.

त्याला न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. घटनेबाबत सूत्रांनी सांगितले, की तरुणी राहत्या घरात पुढील खोलीत झोपलेली होती. वाडीलाल तिच्या घरात घुसला. तिच्याशी अश्लील चाळे करू लागला व लग्नाची मागणी घातली. तरुणीने नकार दिल्याने संतापलेल्या वाडीलालने तोंड दाबून तिच्यावर बलात्कार केला. नंतर तिच्या तोंडात विषारी औषध टाकले. तरुणीने आरडाओरड सुरू केल्याने वरच्या मजल्यावर झोपलेले तिचे वडील खाली आले. त्यांना पाहून वाडीलालने पळ काढला. यापूर्वीही वाडीलालने तिला लग्नाचे आमिष दाखवून लग्न मोडण्यास भाग पाडले होते. तपास सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल जाधव करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सिडको एन ३ भागात महिलेचे मंगळसूत्र हिसकावले, महिलेने धरून ठेवल्याने १ तोळ्यापैकी ३ ग्रॅमचा भाग गेला...

Latest News

सिडको एन ३ भागात महिलेचे मंगळसूत्र हिसकावले, महिलेने धरून ठेवल्याने १ तोळ्यापैकी ३ ग्रॅमचा भाग गेला... सिडको एन ३ भागात महिलेचे मंगळसूत्र हिसकावले, महिलेने धरून ठेवल्याने १ तोळ्यापैकी ३ ग्रॅमचा भाग गेला...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिडको एन ३ भागातील टेनिस कोर्टजवळ दुचाकीस्वार चोरट्यांनी एका महिलेचे मंगळसूत्र हिसकावले. महिलेने मंगळसूत्र...
अपघातानंतर फार्मसिस्टला दुचाकीस्वारांची मारहाण, मोबाइल हिसकावून पळाले... चिकलठाण्यातील घटना
भरधाव ट्रकने दुचाकीला मागून ठोकरले, दाम्‍पत्‍यासह चिमुकली जखमी, वाळूज MIDC तील घटना
रांजणगाव शेणपुंजीत एमआयडीसीच्या जागेवर पुतळा, झेंडा, अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल
मुकुंदवाडीत चुकून धक्का लागल्याने दुचाकीस्वारावर चाकूचे वार!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software