मुले चोरणारी महिला आली... अफवा पसरली, ती निघाली..., वडोदबाजारमध्ये काय हलकल्लोळ माजला...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

फुलंब्री (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वडोदबाजार (ता. फुलंब्री) येथे बुधवारी (८ जानेवारी) रात्री लहान मुले चोरणारी महिला गावात आल्याची अफवा पसरल्याने हलकल्लोळ माजला. शेकडो ग्रामस्थ एकत्र आले आणि महिलेला घेरले. काही अनुचित प्रकार घडण्याआधी वडोदबाजार पोलिसांनी घटनास्थळी धावून महिलेला ताब्यात घेतले. ती मनोरुग्ण असल्याचे नंतर समोर आले. अशा अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक सुनील इंगळे यांनी केले आहे.
नक्की काय घडलं?
गावात एक अनोळखी महिला गावात फिरत होती. तिला काही नागरिकांनी पाहिल्यानंतर ती लहान मुले चोरणारी महिला असल्याची अफवा पसरली. शेकडो ग्रामस्थ एकत्र आले आणि तिला पकडण्यात आले. पोलिसांना कळताच सहायक पोलीस निरीक्षक सुनील इंगळे हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी आले. महिलेला ताब्यात घेत ग्रामस्थांना शांत राहण्याचे आवाहन केले. तिला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर ती विचित्र वागत होती. तिला मराठी समजत नव्हती. ती महाराष्ट्राबाहेरील असावी, असा अंदाज आहे. तिला फुलंब्रीच्या सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी ती मनोरुग्ण असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तिला छत्रपती संभाजीनगरच्या जटवाडा रोडवरील माणुसकी वृद्ध सेवालयात समाजसेवक सुमीत पंडित यांच्याकडे सोपवले. तिच्या नातेवाइकांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. लहान मुले चोरी करणारी कोणतीही टोळी नाही. अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बीड बायपासवरील लॉजवर पकडल्या २ बांगलादेशी महिला

Latest News

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software