- News
- जिल्हा न्यूज
- १६ वर्षीय मुलगी, २३ वर्षीय तरुणीसह २ तरुणांनी घेतला गळफास, एकाचा विहिरीत संशयास्पद मृत्यू
१६ वर्षीय मुलगी, २३ वर्षीय तरुणीसह २ तरुणांनी घेतला गळफास, एकाचा विहिरीत संशयास्पद मृत्यू
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जिल्ह्यात ४ आत्महत्या समोर आल्या असून, यात वैजापूरची १६ वर्षीय मुलगी व वैजापूर तालुक्यातीलच २१ वर्षीय तरुण, छत्रपती संभाजीनगरातील २३ वर्षीय तरुण व २३ वर्षीय तरुणीचा समावेश आहे. खुशी रोहित त्रिभुवन (वय १६ वर्षे, रा. अण्णा भाऊ साठेनगर, वैजापूर), प्रतापसिंह ताटू (वय २१ वर्षे, रा. सटाणा, ता. वैजापूर), अमित विश्वनाथ […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जिल्ह्यात ४ आत्महत्या समोर आल्या असून, यात वैजापूरची १६ वर्षीय मुलगी व वैजापूर तालुक्यातीलच २१ वर्षीय तरुण, छत्रपती संभाजीनगरातील २३ वर्षीय तरुण व २३ वर्षीय तरुणीचा समावेश आहे. खुशी रोहित त्रिभुवन (वय १६ वर्षे, रा. अण्णा भाऊ साठेनगर, वैजापूर), प्रतापसिंह ताटू (वय २१ वर्षे, रा. सटाणा, ता. वैजापूर), अमित विश्वनाथ जाधव (वय २३, रा. देवळाई, छत्रपती संभाजीनगर) श्रद्धा अशोक वीर (वय २३, रा. मथुरानगर, कमळापूर, जोगेश्वरी) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. चौघांच्याही आत्महत्येची कारणे अद्याप समोर आलेली नाहीत.
घटना चौथी : वैजापूर शहरातील अण्णा भाऊ साठेनगरात शुक्रवारी (५ जुलै) सकाळी ११ वाजता खुशी रोहित त्रिभुवन या अल्पवयीन मुलीने घरात गळफास घेतला. ही बाब लक्षात येताच तिच्या पालकांनी तिला शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सिल्लोडमध्ये मजुराचा विहिरीत संशयास्पद मृत्यू…
सिल्लोड : तालुक्यातील वरूड येथे शनिवारी (६ जुलै) दुपारी २.३० वाजेच्या सुमारास विहिरीत आडवे बोअर घेत असताना रमेश भास्कर दगडघाटे (वय ३३ वर्षे, रा. बनकिन्होळा) या मजुराला अचानक चक्कर येऊन तो विहिरीत कोसळला. त्याचा जागीच मृत्यू झाला. विहिरीवर आडवे बोअर घेण्याच्या इंजिनवर रमेश मजूर म्हणून काम करत होता. वरुड येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीत आडवे बोर घेण्याचे काम करण्यासाठी तो आला होता. त्याला सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. बनकिन्होळा येथे त्याच्या पार्थिवावर रात्री ८ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. रमेशचा हृदयविकाराने मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

