सावंगी-गणोरी रस्ता गेला चिखलात, नागरिक, शेतकऱ्यांचे हाल

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सावंगी (हर्सूल) ते गणोरी रस्त्याची अवस्था अत्‍यंत बिकट झाली असून सध्या पावसाळ्यामुळे रस्त्‍यात चिखलच चिखल झाला आहे. रस्त्याने वाहन चालवणे तर दूरच, पण चालणेही अवघड झाले आहे. शेतकरी, विद्यार्थ्यांसह नागरिकांची या रस्त्याने मोठी येजा असते. मात्र रस्त्याच्या अवस्थेमुळे अनेकांची पडझड होऊन दुखापत होण्याच्या घटना वाढल्या आहेत. बांधकाम विभागाने या रस्त्याकडे […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सावंगी (हर्सूल) ते गणोरी रस्त्याची अवस्था अत्‍यंत बिकट झाली असून सध्या पावसाळ्यामुळे रस्त्‍यात चिखलच चिखल झाला आहे. रस्त्याने वाहन चालवणे तर दूरच, पण चालणेही अवघड झाले आहे.

शेतकरी, विद्यार्थ्यांसह नागरिकांची या रस्त्याने मोठी येजा असते. मात्र रस्त्याच्या अवस्थेमुळे अनेकांची पडझड होऊन दुखापत होण्याच्या घटना वाढल्या आहेत. बांधकाम विभागाने या रस्त्याकडे तातडीने लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी या भागातील नागरिकांसह शेतकऱ्यांनी केली आहे. सावंगीपासून हा रस्ता नायगाव, भिकापूर, गणोरी, पुढे किनगाव बाजार, लोणी आणि कन्‍नडला जातो. रात्री चालणाऱ्या मुरुमाच्या गाड्यांमुळे या रस्त्याची अवस्था दयनीय झाल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. रस्‍त्‍यावर अपघात वाढल्याने तातडीने दुरुस्ती करावी. रस्त्याचे डांबरीकरणे करावे, अशी मागणी केली जात आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

State News : कलाकेंद्रातील मुलीवर लॉजवर तिघांचा सामूहिक बलात्कार, बीडच्या घटनेने राज्यात खळबळ!

Latest News

State News : कलाकेंद्रातील मुलीवर लॉजवर तिघांचा सामूहिक बलात्कार, बीडच्या घटनेने राज्यात खळबळ! State News : कलाकेंद्रातील मुलीवर लॉजवर तिघांचा सामूहिक बलात्कार, बीडच्या घटनेने राज्यात खळबळ!
बीड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : कला केंद्रातील मुलीला अंबाजोगाई येथील साई लॉजवर नेऊन तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली...
State Political News : मीरा-भाईंदरमध्ये महायुतीबाबत सस्पेन्स कायम!, भाजपची ‘७० पार’ची घोषणा अन्‌ शिंदे गटाचा फिफ्टी- फिफ्टी फार्मूला!!
कमावत्या पत्नीला पोटगीचा अधिकार नाही; मुंबई उच्च न्यायालयाने महिलेची याचिका फेटाळली
विभागीय आयुक्‍त कार्यालयासमोर सरपंचपती, ग्रा. पं. अधिकाऱ्याचा राडा!; दोन गटांत हाणामारी, छत्रपती संभाजीनगरची घटना, प्रकरण लातूरचे, सुनावणीसाठी होते छ. संभाजीनगरला...
मिल कॉर्नर हिट ॲन्ड रन; क्रांती चौक पोलिसांनी केला ‘या’ कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software