लघुशंकेसाठी दुचाकी उभी केली, आडोशाला गेला, पुढे जे घडलं, ते पाहून पळतच पोलीस ठाण्यात आला…, पैठणची घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : पत्‍नीला भेटायला तिच्या माहेरी आलेल्या पतीला पैठणमध्ये वेगळ्याच संकटाला सामोरे जावे लागले. दुचाकी रस्त्याच्या बाजूला उभी करून लघुशंकेसाठी गेला असता दोन चोरटे आले आणि गाडीच्या सीटवर ठेवलेला मोबाइल व पैशांचे पाकीट घेऊन पळून गेले. ही घटना रविवारी (१६ मार्च) रात्री साडेआठच्या सुमारास पैठण शहरातील गोलनाका येथे घडली. पांडुरंग नारायण गव्हाणे (वय […]

पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : पत्‍नीला भेटायला तिच्या माहेरी आलेल्या पतीला पैठणमध्ये वेगळ्याच संकटाला सामोरे जावे लागले. दुचाकी रस्त्याच्या बाजूला उभी करून लघुशंकेसाठी गेला असता दोन चोरटे आले आणि गाडीच्या सीटवर ठेवलेला मोबाइल व पैशांचे पाकीट घेऊन पळून गेले. ही घटना रविवारी (१६ मार्च) रात्री साडेआठच्या सुमारास पैठण शहरातील गोलनाका येथे घडली.

पांडुरंग नारायण गव्हाणे (वय २७, रा. बादली ता. घनसावंगी जि.जालना) याने या प्रकरणात तक्रार दिली आहे. तो मासेमारी करतो. कुटुंबासह राहतो. त्याची पत्नी प्रसुतीसाठी माहेरी लक्ष्मीनगर, पैठण येथे आलेली असल्याने तो रविवारी (१६ मार्च) सायंकाळी साडेसातच्या सुमारास सासरवाडीला पैठण येथे आला होता. सोबत पत्नीच्या दवाखान्याच्या खर्चासाठी ३० हजार रुपये घेऊन आला होता. रात्री साडेआठच्या सुमारास तो मोटारसायकल घेऊन गोलनाका येथे गेला.

तिथे शेवगावच्या दिशेने तोंड करून मोटारसायकलवर सॅमसंग कंपनीचा मोबाईल व ३० हजार रुपये असलेले पाकीट गाडीच्या सीटवर ठेवून लघवी करण्यासाठी थोडा बाजूला गेला असता दोन अनोळखी व्यक्‍ती (वय अंदाजे ३० ते ३५) सडपातळ बांध्याचे एकाच्या अंगात टी-शर्ट व एकाच्या अंगावर शर्ट घातलेले व दोघांनी तोंडाला काळे मास्क लावलेले असे आले. त्यांनी पांडुरंगचा १५ हजार रुपयांचा मोबाइल व ३० हजार रुपये असलेले पाकीट घेऊन अंधारात पळून गेले. पैठण पोलिसांनी दोन्ही चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दशरथ बारकुल करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

Latest News

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू... अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software