- News
- जिल्हा न्यूज
- दोन तरुणांची आत्महत्या; एकाने घरात, दुसऱ्याने रस्त्यावरील झाडाला घेतला गळफास, सिल्लोड, गंगापूरच्या...
दोन तरुणांची आत्महत्या; एकाने घरात, दुसऱ्याने रस्त्यावरील झाडाला घेतला गळफास, सिल्लोड, गंगापूरच्या घटना
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
सिल्लोड/गंगापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : दोन तरुणांनी आत्महत्या केल्याची घटना सिल्लोड आणि गंगापूर तालुक्यात समोर आली आहे. एकाने शेतातील झाडाला तर दुसऱ्याने घरात गळफास घेतला. सिल्लोड : रस्त्यावरील झाडाला गळफास…सिल्लोड शहर पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या आव्हाना रस्त्यावरील दहिगाव शिवारात शनिवारी पहाटे सुखदेव जमलाल ब्राह्मणे (वय २४, रा. आव्हाना ता. भोकरदन जि. जालना) हा तरुण रस्त्यावरील एका झाडाला […]
सिल्लोड/गंगापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : दोन तरुणांनी आत्महत्या केल्याची घटना सिल्लोड आणि गंगापूर तालुक्यात समोर आली आहे. एकाने शेतातील झाडाला तर दुसऱ्याने घरात गळफास घेतला.
सिल्लोड शहर पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या आव्हाना रस्त्यावरील दहिगाव शिवारात शनिवारी पहाटे सुखदेव जमलाल ब्राह्मणे (वय २४, रा. आव्हाना ता. भोकरदन जि. जालना) हा तरुण रस्त्यावरील एका झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेला आढळला. त्याला नातेवाइकांनी सिल्लोडच्या उपजिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेची सिल्लोड शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद घेतली आहे. सुखदेव छत्रपती संभाजीनगरातील एका दारूच्या दुकानावर कामाला होता. त्या ठिकाणी दोन दिवसांपूर्वी त्याच्या नावावर दहा ते बारा लाख रुपयांची बाकी निघाली होती. त्यानंतर तो शुक्रवारी गावाकडे आला. आत्महत्येचे कारण पोलीस शोधत आहेत.
गंगापूर तालुक्यातील कदीम शहापूर येथे शनिवारी दुपारी तीनला महेश संजय चापे (वय २१, रा. कदीम शहापूर) याने घराच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. तो एकुलता एक मुलगा होता. परिसरातील एका कंपनीत कामाला होता. शनिवारी सकाळी त्याचे आई- वडील शेतात कामाला गेले होते. दुपारी तीनला वडील घरी आल्यानंतर त्यांना महेशने आत्महत्या केल्याचे दिसले. वाळूज पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेची नोंद वाळूज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. महेशने आत्महत्या का केली, याची माहिती मिळू शकली नाही. त्याच्या पश्चात आई-वडील, बहीण, चुलते असा परिवार आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
17 Dec 2025 17:32:08
बीड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : कला केंद्रातील मुलीला अंबाजोगाई येथील साई लॉजवर नेऊन तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली...

