जायकवाडी धरण ८१ टक्‍के भरले!; पिण्यासह उद्योग, शेतीचीही वर्षभराची चिंता मिटली!!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : जायकवाडी धरण आज, ३१ ऑगस्टला सकाळी ६ वाजता ८१. २५ टक्‍के इतके भरल्याची आकडेवारी पाटबंधारे विभागाने जाहीर केली. त्‍यामुळे वर्षभराचा सिंचन, उद्योग आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातील लहान, मोठी सर्व धरणे आणि बंधारे काठोकाठ भरल्याने या दोन्ही जिल्ह्यांतून जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत आहे. सप्टेंबरमध्येही […]

पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : जायकवाडी धरण आज, ३१ ऑगस्टला सकाळी ६ वाजता ८१. २५ टक्‍के इतके भरल्याची आकडेवारी पाटबंधारे विभागाने जाहीर केली. त्‍यामुळे वर्षभराचा सिंचन, उद्योग आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातील लहान, मोठी सर्व धरणे आणि बंधारे काठोकाठ भरल्याने या दोन्ही जिल्ह्यांतून जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत आहे. सप्टेंबरमध्येही हवामान विभागाने चांगला पाऊस सांगितलेला असल्याने पुढेही धरणात पाण्याची आवक कायम राहणार आहे.

जायकवाडी धरणातून छत्रपती संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा होतो. छत्रपती संभाजीनगरसह जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यातील सुमारे १ लाख ८० हजार हेक्टर जमिनीवरील पिकांना धरणातील पाणी देण्यात येते. लवकरच जायकवाडी प्रकल्प शंभर टक्के भरेल, अशी शक्यता कडाचे अधीक्षक अभियंता एस. के. सब्बीनवार यांनी वर्तविली आहे. जायकवाडी धरण भरण्याची शक्‍यता लक्षात घेऊन माजलगाव धरणासाठी जायकवाडीतून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे.

यावर्षी रब्बी हंगामासाठी तीन तर उन्हाळी पिकांसाठी ४ आवर्तने अशी एकूण सात आवर्तने सोडली जाणार असून, त्यातून सुमारे १५०० दलघमी पाणी सिंचनासाठी दिले जाणार आहे. उद्योग आणि पिण्यासाठी २०० दलघमी पाणी देता येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली. आज सकाळी सहाला धरणात एकूण पाणीसाठा ८८.३५ टीएमसी नोंदवला गेला. जीवंत पाणीसाठा ६२.२९ टीएमसी असून धरणाची एकूण साठवण क्षमता १०२.७३ टीएमसी इतकी आहे. सध्या धरणात १०३० क्‍युसेकने पाणी दाखल होत असून, माजलगाव धरणाकरिता सकाळी ६ पर्यंत ५.६६ क्‍युसेक पाणी जायकवाडी धरणातून सोडले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

ना रस्ता, ना पाणी, ना ड्रेनेज सुविधा... वडगाव कोल्हाटीतील महिला आक्रमक, रस्‍त्‍यावरील सांडपाण्याला ‘प्रशासन’ म्हणत वाहिली श्रद्धांजली!

Latest News

ना रस्ता, ना पाणी, ना ड्रेनेज सुविधा... वडगाव कोल्हाटीतील महिला आक्रमक, रस्‍त्‍यावरील सांडपाण्याला ‘प्रशासन’ म्हणत वाहिली श्रद्धांजली! ना रस्ता, ना पाणी, ना ड्रेनेज सुविधा... वडगाव कोल्हाटीतील महिला आक्रमक, रस्‍त्‍यावरील सांडपाण्याला ‘प्रशासन’ म्हणत वाहिली श्रद्धांजली!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसी परिसरातील वडगाव कोल्हाटीतील गट नं. ९ मधील रहिवासी अनेक वर्षांपासून मुलभूत सुविधांपासून...
एसटी बसने दागिने घेऊन प्रवास करत असाल तर सतर्क व्हा, चोर महिलांच्या टोळ्या तुमचे दागिने चोरून होतील गायब!, शास्‍त्रीनगरातील महिलेचेही सव्वा लाखाचे दागिने नेले...
सिल्लोडच्या अन्वीत तरुणाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या
आदर्श घोटाळ्यातील संशयित महिला चक्क शिंदे गटात दाखल!  
जाधववाडीत २३ वर्षीय तरुणाची आत्‍महत्‍या, प्रेमप्रकरणातून टोकाचे पाऊल : पोलीस सूत्र
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software