छत्रपती संभाजीनगरच्या दोन वारकऱ्यांवर काळाचा घाला!; एकाला वाहनाने चिरडले, दुसऱ्याला हार्ट ॲटॅक

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर/कन्‍नड (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन वारकऱ्यांवर काळाने घाला घातला. एकाला अज्ञात वाहनाने चिरडले तर दुसऱ्या वारकऱ्याला हार्टॲटॅक आला. एकनाथ भानदास नवपुते (वय ८२, रा. घारदोन- कचनेर, ता. छत्रपती संभाजीनगर) आणि अशोक नामदेव चव्हाण (वय ५५, रा. चिंचखेडा खुर्द, ता. कन्नड) अशी मृत्‍यू झालेल्या वारकऱ्यांची नावे आहेत. चापानेर येथून संत वैजीनाथ महाराज […]

छत्रपती संभाजीनगर/कन्‍नड (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन वारकऱ्यांवर काळाने घाला घातला. एकाला अज्ञात वाहनाने चिरडले तर दुसऱ्या वारकऱ्याला हार्टॲटॅक आला. एकनाथ भानदास नवपुते (वय ८२, रा. घारदोन- कचनेर, ता. छत्रपती संभाजीनगर) आणि अशोक नामदेव चव्हाण (वय ५५, रा. चिंचखेडा खुर्द, ता. कन्नड) अशी मृत्‍यू झालेल्या वारकऱ्यांची नावे आहेत.

चापानेर येथून संत वैजीनाथ महाराज कर्डिले यांचा दिंडी सोहळा १५ वर्षांपासून पंढरपूरला आषाढी वारीसाठी पायी जातो. ही वारी ३० जूनला हभप सोमनाथ महाराज कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली निघाली आहे. शुक्रवारी सकाळी नऊला दिंडी अहमदनगर जिल्ह्यातील इमामपूर येथे नाश्ता करण्यासाठी थांबली असता वारकरी अशोक चव्हाण छत्रपती संभाजीनगर ते अहमदनगर हा महामार्ग ओलांडत असताना अज्ञात वाहनाने त्यांना चिरडले. त्‍यांचा जागीच मृत्‍यू झाला.चव्हाण यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, चार मुली, सून, नातवंडे, जावई असा परिवार आहे. चिंचखेडा खुर्द येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दुसऱ्या घटनेत कचनेर घारदोन येथील एकनाथ नवपुते यांना पंढरपूरमध्ये हृदयविकाराचा झटका आला. यातच गुरुवारी दुपारी त्‍यांचे निधन झाले. नवपुते हे अनेक वर्षांपासून आषाढी वारीला पंढरपूरला पायी जात होते. यावर्षी ते आळंदी येथून दिंडीत पायी गेले होते. पुढे जाऊन दर्शन घेऊन परत दिंडीत येण्यासाठी ते गुरुवारी दुपारी पंढरपूर येथील बसस्थानकावर उतरले. तेथेच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

ब्रिजवाडी जमीन गैरव्यवहार प्रकरणी विशेष तपास पथक गठीत, तीन महिन्यांत अहवाल सादर होणार, जिल्ह्यातील जमीन गैरव्यवहारांचीही होणार चौकशी

Latest News

ब्रिजवाडी जमीन गैरव्यवहार प्रकरणी विशेष तपास पथक गठीत, तीन महिन्यांत अहवाल सादर होणार, जिल्ह्यातील जमीन गैरव्यवहारांचीही होणार चौकशी ब्रिजवाडी जमीन गैरव्यवहार प्रकरणी विशेष तपास पथक गठीत, तीन महिन्यांत अहवाल सादर होणार, जिल्ह्यातील जमीन गैरव्यवहारांचीही होणार चौकशी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) :  छत्रपती संभाजीनगर शहरातील ब्रिजवाडी येथील गट क्रमांक ३० मधील ५४ एकर ३१ आर जमिनीच्या...
वाळूज महानगरात दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेचे गंठण हिसकावले!
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत औषध निरीक्षक गट-ब चाळणी परीक्षा २२ मार्चला; छत्रपती संभाजीनगरमध्ये ११ हजार ६४० उमेदवार देणार परीक्षा
विवाहितेच्या छळप्रकरणी बेगमपुरा पोलिसांत पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
खिडक्या, शू रॅकमध्ये चाव्या ठेवणे करा बंद, वाढताहेत चोऱ्या, जाताहेत मौल्यवान वस्तू, आता सिडको एन ६ मध्ये चोरी!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software