गल्लेबोरगावमध्ये दूध संकलन केंद्रावर आढळला १० लाखांचा गांजा!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

खुलताबाद (सीएससीएन वृत्तसेवा) : गल्लेबोरगाव (ता. खुलताबाद) येथील वाल्मीक आसाराम मानकीकर याच्या दूध संकलन केंद्रावर गांजाची विक्री होत होती. छत्रपती संभाजीनगर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मंगळवारी (९ जुलै) दुपारी दोनला छापा मारून १० लाख रुपयांचा ८४ किलो गांजा जप्त केला. मानकीकरला अटक केली आहे. मानकीकर हा दूध संकलन केंद्रावर गांजा विक्री करत असल्याची […]

खुलताबाद (सीएससीएन वृत्तसेवा) : गल्लेबोरगाव (ता. खुलताबाद) येथील वाल्मीक आसाराम मानकीकर याच्या दूध संकलन केंद्रावर गांजाची विक्री होत होती. छत्रपती संभाजीनगर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मंगळवारी (९ जुलै) दुपारी दोनला छापा मारून १० लाख रुपयांचा ८४ किलो गांजा जप्त केला. मानकीकरला अटक केली आहे.

मानकीकर हा दूध संकलन केंद्रावर गांजा विक्री करत असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे यांना मिळाली होती. त्‍यांच्या आदेशाने पथकाने छापा मारला. या वेळी खुलताबादचे नायब तहसीलदार डॉ. गणेश देसाई, रासायनिक विश्लेषक गोविंद भोसले, मंडळ अधिकारी भाग्यश्री दुतोंडे, तलाठी कल्पना डिघोळे, पोलीस पाटील सिंधू बढे, दुय्यम निरीक्षक शाहू घुले, सरपंच संतोष राजपूत यांची उपस्थिती होती. ही कारवाई उपअधीक्षक गुणाजी क्षीरसागर, कन्‍नड विभागाचे निरीक्षक अशोक साळुंखे, निरीक्षक राहुल गुरव यांनी केली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

State News : कलाकेंद्रातील मुलीवर लॉजवर तिघांचा सामूहिक बलात्कार, बीडच्या घटनेने राज्यात खळबळ!

Latest News

State News : कलाकेंद्रातील मुलीवर लॉजवर तिघांचा सामूहिक बलात्कार, बीडच्या घटनेने राज्यात खळबळ! State News : कलाकेंद्रातील मुलीवर लॉजवर तिघांचा सामूहिक बलात्कार, बीडच्या घटनेने राज्यात खळबळ!
बीड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : कला केंद्रातील मुलीला अंबाजोगाई येथील साई लॉजवर नेऊन तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली...
State Political News : मीरा-भाईंदरमध्ये महायुतीबाबत सस्पेन्स कायम!, भाजपची ‘७० पार’ची घोषणा अन्‌ शिंदे गटाचा फिफ्टी- फिफ्टी फार्मूला!!
कमावत्या पत्नीला पोटगीचा अधिकार नाही; मुंबई उच्च न्यायालयाने महिलेची याचिका फेटाळली
विभागीय आयुक्‍त कार्यालयासमोर सरपंचपती, ग्रा. पं. अधिकाऱ्याचा राडा!; दोन गटांत हाणामारी, छत्रपती संभाजीनगरची घटना, प्रकरण लातूरचे, सुनावणीसाठी होते छ. संभाजीनगरला...
मिल कॉर्नर हिट ॲन्ड रन; क्रांती चौक पोलिसांनी केला ‘या’ कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software