कर्जबाजारी शेतकऱ्याने शेतात गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा, सोयगावची हृदयद्रावक घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

सोयगाव (सीएससीएन वृत्तसेवा) : सोयगाव तालुक्यातील निंबायती शिवारात शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन रामलाल चतरू राठोड (वय ५२, रा. निंबायती) या अल्पभूधारक कर्जबाजारी शेतकऱ्याने आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (१६ जानेवारी) सकाळी आठला घडली. राठोड यांच्याकडे एकत्रित कुटुंबात दोन एकर शेती असून, त्यांच्यावर बँकेसह खासगी ३ लाख रुपये कर्ज होते. खरिपाचे पीक अतिवृष्टीमुळे हातचे गेले. […]

सोयगाव (सीएससीएन वृत्तसेवा) : सोयगाव तालुक्यातील निंबायती शिवारात शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन रामलाल चतरू राठोड (वय ५२, रा. निंबायती) या अल्पभूधारक कर्जबाजारी शेतकऱ्याने आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (१६ जानेवारी) सकाळी आठला घडली.

राठोड यांच्याकडे एकत्रित कुटुंबात दोन एकर शेती असून, त्यांच्यावर बँकेसह खासगी ३ लाख रुपये कर्ज होते. खरिपाचे पीक अतिवृष्टीमुळे हातचे गेले. रब्बी पिकातही फारशे उत्पन्न हाती आले नाही. त्‍यामुळे ते नैराश्यात होते. कर्ज कसे फेडावे, कुटुंबाचा गाडा कसा चालवावा, याची चिंता त्‍यांना होती. यातूनच त्‍यांनी टोकाचे पाऊल उचलले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. जरंडी प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेहाची उत्तरीय तपासणी केल्यानंतर सायंकाळी चारला त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, एक भाऊ, पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट

Latest News

समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहराजवळील गांधेली येथे मंगळवारी (१० मार्च) रात्री ९ च्या सुमारास हभप निवृत्ती...
सोशल मीडियातून ओळख, प्रेम, ४ महिने सहवास, नंतर जातीवरून युवतीला लाथाबुक्क्या!; प्रियकरासह त्याची आई, दोन बहिणी, भावाविरुद्ध ‘ॲट्रॉसिटी’, पाचोडची घटना
भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना
नापिकी, कर्जबाजारीपणाचे आणखी २ बळी!; सिल्लोड, कन्नड तालुक्यातील २ शेतकऱ्यांनी कवटाळले मरण!!
फीट येऊन चुलीवर पडल्याने महिलेचा मृत्यू, सातारा परिसरातील संत ज्ञानेश्वरनगरातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software