वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतीकडून बनवाबनवी सुरूच... पत्राद्वारे खोटे दावे, महिलांनी अक्षरशः धुडकावले!; उपोषण सुरूच 

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वडगाव कोल्हाटीच्या ग्रामपंचायतीने आज, १३ डिसेंबरला कहरच केला. थेट कागदोपत्री बनवाबनवीचा केलेला प्रयत्न उपोषणकर्त्या महिलांनी हाणून पाडला. चक्क पत्रात ग्रामपंचायतीने दावा केला, की गट नं. ९ मध्ये १ कोटी २० लाख रुपये खर्च केले. पण महिला या मुलभूत सुविधांसाठी उपोषणाला बसल्या आहेत. त्यामुळे त्यांनी एवढे पैसे खर्च कुठे केले, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याची स्वतंत्र चौकशी होण्याची गरज निर्माण झाली आहे. तूर्त जोपर्यंत प्रत्यक्ष कामे सुरू होत नाहीत तोपर्यंत मागे न हटण्याचा महिलांचा निर्धार कायम आहे. त्यामुळे आज, १३ डिसेंबरला तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरू होते.

प्रचंड उत्पन्न असूनही वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायत नागरिकांना मुलभूत सोयीसुविधा पुरवण्यात अपयशी ठरली आहे. प्रदीर्घ काळापासून वीज, पाणी आणि ड्रेनेज समस्येला घेऊन गट क्रमांक ९ मधील महिला ग्रामपंचायतीचे उंबरठे झिजवत आहेत. दरवेळी आश्वासने देऊन वेळ मारून नेणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या तोंडाला आता महिलांच्या उपोषणामुळे फेस आला आहे. ११ डिसेंबरपासून या महिला उपोषणाला बसल्या आहेत. विशेष म्हणजे, ग्रामपंचायतीने आज जे पत्र महिलांना देऊन उपोषण सोडविण्याचा प्रयत्न केला, ते निलाजरेपणाचा कळस म्हणावा. या पत्रात ग्रामपंचायतीने म्हटले, की तुम्ही मागील वर्षी उपोषणाला बसल्या तेव्हा मंत्री संजय शिरसाट यांनी उपोषण सोडवले होते. त्यावेळी त्यांच्या आमदार निधीतून ८० लाख आणि १५ व्या वित्त आयोग निधीतून ४० लाख असा एकूण १ कोटी २० रुपयांचा निधी गट नं. ९ मध्ये खर्च केला. त्यामुळे सर्वांनाच प्रश्न पडला आहे, की हा निधी ग्रामपंचायतीने कसा आणि कुठे खर्च केला आहे.

कारण पाणी, रस्ते आणि ड्रेनेज या मुलभूत सुविधांसाठी आंदोलन सुरू आहे. निलाजरेपणाचा कळस म्हणजे, ग्रामपंचायतीचा दुसरा दावा, असा की इतर गट नंबरमध्येही कामांसाठी निधी खर्च करावा लागतो. सगळा निधी एकाच गटनंबरमध्ये खर्च केला तर बाकीकडे विकासकामे तशीच राहतील. गट नंबर ९ मध्ये रस्ता नाही, पाणी नाही, ड्रेनेज व्यवस्था नाही, मग विकासकामे अशी कोणती केली, ज्यामुळे सगळा निधी खर्चाची चिंता ग्रामपंचायतीला लागली? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. जलजीवन मिशनमधून पाण्याच्या टाकीचे काम होऊन पाण्याचा प्रश्न सुटेल, असा दावा पत्रात केला आहे. तूर्त महिलांनी ग्रामपंचायतीच्या या बनवाबनवीला धुडकावले असून, उपोषण सुरूच ठेवले आहे. त्यामुळे आता उपोषण सोडायचे कसे, असा प्रश्न ग्रामपंचायतीच्या कर्त्यांना पडला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रशासनाची काय तयारी, मतदारांपासून बंदोबस्तापर्यंत, उमेदवारांना सूचना काय... जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच सांगितले... ही बातमी प्रत्येकाने आवर्जुन वाचा...

Latest News

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रशासनाची काय तयारी, मतदारांपासून बंदोबस्तापर्यंत, उमेदवारांना सूचना काय... जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच सांगितले... ही बातमी प्रत्येकाने आवर्जुन वाचा... छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रशासनाची काय तयारी, मतदारांपासून बंदोबस्तापर्यंत, उमेदवारांना सूचना काय... जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच सांगितले... ही बातमी प्रत्येकाने आवर्जुन वाचा...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन...
असा आला, असा निघून गेला...CCTV मध्ये हा कोण दिसला?, वाळूज महानगरातील घटना
आत मतमोजणी, बाहेर अलोट गर्दी, मानली संधी अन्‌ चोरट्यांनी कमावले १० लाख!; गरवारे स्टेडियमवर सोन्याचे दागिने, रोकडवर मारला हात!!
तुझ्यामुळेच पराभूत झालो म्हणत भाजप उमेदवाराच्या घरावर टोळक्याचा सशस्‍त्र हल्ला!, क्रांती चौक भागातील गांधीनगरातील मध्यरात्रीचा थरार
विकास जैन यांनी ACP देशमुख यांचा गळा पकडून मागे ढकलले, बाकीच्यांनी हल्ला केला, म्हणून पोलिसांनी लाठीमार केला!; जैन, राजपूत, जीवनवाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल, शासकीय अभियांत्रिकी महावि‌द्यालयाच्या मतमोजणी केंद्रावरील दुसरी बाजू आली समोर 
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software