वेरूळ- घृष्णेश्वर विकास आराखड्याची कामे मुदतीत पूर्ण करा; अप्पर मुख्य सचिव बी. वेणू गोपाल रेड्डींनी दिला अल्टिमेटम

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वेरूळ- घृष्णेश्वर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामे विहित मुदतीत पूर्ण करा. या विकासात स्थानिकांच्या गरजांना प्राधान्य द्या. स्थानिक रहिवाशांचा सहभाग विकास प्रक्रियेत घ्यावा, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव बी. वेणू गोपाल रेड्डी यांनी आज, १ जानेवारीला वेरूळ येथे दिले.

श्रीक्षेत्र घृष्णेश्वर व वेरूळ तीर्थक्षेत्र विकास आराखड्या अंतर्गत सुरू असलेल्या प्रगतिपथावरील कामांची पाहणी रेड्डी यांनी केली. त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता दीपक कोळी, भारतीय पुरातत्व विभागाचे शिवकुमार भगत, उपविभागीय अधिकारी संतोष गोरड तसेच अन्य विभाग प्रमुख उपस्थित होते. घृष्णेश्वर मंदिर परिसर दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी मार्गिका, प्रगतिपथावर असलेले विश्रामगृह, सुविधा केंद्र आदी विविध कामांची पाहणी रेड्डी यांनी केली.

त्यानंतर झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी सूचना केल्या की, तीर्थक्षेत्र विकास सुविधांची कामे करताना स्थानिकांच्या गरजांना प्राधान्य दिले पाहिजे. स्थानिक कारागिरांनी तयार केलेली उत्पादने तसेच कलावस्तू यांच्या विक्रीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी. या वस्तू व उत्पादने येणाऱ्या पर्यटकांना खरेदीसाठी उपलब्ध व्हाव्या. स्थानिक खाद्य संस्कृती, कला यांचेही सादरीकरण पर्यटकांना व्हावे. भाविकांसाठीचे पादचारी मार्ग, वाहनांचे पार्किंग तसेच शैक्षणिक सहलींचाही विचार या आराखड्यात करण्यात यावा. सौर ऊर्जेचा अधिकाधिक वापर करण्यात यावा, अशा सूचना त्यांनी केल्या. बैठकीस भारतीय पुरातत्व विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग पर्यटन विकास महामंडळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरण वनविभाग अशा विविध विभागांचे अधिकारी सहभागी झाले होते.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना

Latest News

भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना
वैजापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : भरधाव पिकअप वाहनाने दिलेल्या धडकेत २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही घटना पुरणगाव (ता. वैजापूर)...
नापिकी, कर्जबाजारीपणाचे आणखी २ बळी!; सिल्लोड, कन्नड तालुक्यातील २ शेतकऱ्यांनी कवटाळले मरण!!
फीट येऊन चुलीवर पडल्याने महिलेचा मृत्यू, सातारा परिसरातील संत ज्ञानेश्वरनगरातील घटना
३ दिवसांपासून बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह आढळला नदीकाठी!; कन्नडच्या घटनेने खळबळ
विहिरीत पडून १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू, पिशोर येथील दुर्दैवी घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software