इतकी कामे बाकी आहेत अजून ४ महिने तरी लागणार... शहर नवीन पाणी योजनेची डेडलाइन पुन्हा हुकणार!; मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेतच...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : नवीन पाणी योजनेची डेडलाइन पुन्हा हुकणार आहे. पहिल्या टप्प्यातून दोनशे एमएलडी पाणी शहराला मिळणार होते. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिसेंबरची डेडलाइन यंत्रणेला दिली होती. मात्र अद्याप बरीच कामे बाकी आहेत. विद्युत यंत्रणेची कामेही झालेली नाहीत.

दोनशे एमएलडी पाणी शहरात आणण्यासाठी जॅकवेलमध्ये ३७०० हॉर्सपॉवर क्षमतेचे दोन पंप बसविलेले असून, या पंपांवर तेवढ्याच क्षमतेची विद्युत मोटार बसविणे अजून सुरू आहे. शनिवारी एक पंपावर विद्युत मोटार बसविली. दुसरी मोटार बसविण्यासाठी स्ट्रक्चरल डिझाइनमध्ये बदल करावा लागणार असल्याचे समोर आले. त्यामुळे आता त्यात महिना उलटणार आहे. मोटार बसविल्यावर त्यावर पत्र्याचे शेडही उभारावे लागणार आहे. त्यात आणखी १५ दिवस जातील. विद्युत उपकेंद्र उभारणेही अद्याप बाकी आहे.

त्याचे काम अंतिम टप्प्यात आल्याचे सांगण्यात येते. अतिउच्च दाब वीजवाहिनी टाकली जात असून त्याचे दोनशे मीटरचे काम बाकी आहे. त्यानंतर ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी दोन महिने लागणार आहेत. सात ठिकाणी मुख्य जलवाहिनी जोडणीचे कामही बाकी आहे. सर्व कामे पूर्ण व्हायला किमान आणखी ४ महिने लागतील किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीही लागू शकतो. त्यामुळे महापालिका निवडणुकीत या योजनेचे श्रेय घेण्याची योजना सत्ताधाऱ्यांना बनवता येणार आहे. तसे करायला गेले तर ज्‍या पद्धतीने योजनेचे काम सुरू आहे आणि तारीख पे तारीख दिली जात आहे. या गोष्टी अंगलट येऊ शकतात.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सिडको एन ३ भागात महिलेचे मंगळसूत्र हिसकावले, महिलेने धरून ठेवल्याने १ तोळ्यापैकी ३ ग्रॅमचा भाग गेला...

Latest News

सिडको एन ३ भागात महिलेचे मंगळसूत्र हिसकावले, महिलेने धरून ठेवल्याने १ तोळ्यापैकी ३ ग्रॅमचा भाग गेला... सिडको एन ३ भागात महिलेचे मंगळसूत्र हिसकावले, महिलेने धरून ठेवल्याने १ तोळ्यापैकी ३ ग्रॅमचा भाग गेला...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिडको एन ३ भागातील टेनिस कोर्टजवळ दुचाकीस्वार चोरट्यांनी एका महिलेचे मंगळसूत्र हिसकावले. महिलेने मंगळसूत्र...
अपघातानंतर फार्मसिस्टला दुचाकीस्वारांची मारहाण, मोबाइल हिसकावून पळाले... चिकलठाण्यातील घटना
भरधाव ट्रकने दुचाकीला मागून ठोकरले, दाम्‍पत्‍यासह चिमुकली जखमी, वाळूज MIDC तील घटना
रांजणगाव शेणपुंजीत एमआयडीसीच्या जागेवर पुतळा, झेंडा, अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल
मुकुंदवाडीत चुकून धक्का लागल्याने दुचाकीस्वारावर चाकूचे वार!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software