विद्यापीठात पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त परिसंवाद,  कौशल्य मंत्री लोढा येणार

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ‘पंडित दीनदयाल उपाध्याय : एकात्म मानव दर्शन’ या विषयावर २५ व २६ सप्टेंबर रोजी परिसंवाद आयोजित केला आहे. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा हे या परिसंवादनिमित्त शुक्रवारी (२६ सप्टेंबर) सकाळी ९ ते १२ या वेळेत विद्यापीठात उपस्थित राहणार आहेत. मुंबई येथील रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठही यात सहभागी होणार आहे.

दिनदयाल उपाध्याय कौशल्य केंद्राच्या वतीने हा कार्यक्रम होत आहे. महोत्सवाचे उद्‌घाटन गुरुवारी (२५ सप्टेंबर) सकाळी १० वाजता होणार आहे. नाट्यगृहात होणाऱ्या या कार्यक्रमास कुलगुरू डॉ. विजय फुलारी, कुलगुरू डॉ. अपुर्वा पालकर, अप्पर मुख्य सचिव मनिष वर्मा, डॉ. उपेंद्र कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती राहील. खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांचे ‘ग्रामीण विकास व समुदाय सहभाग’, पद्मश्री गिरीश प्रभुणे यांचे ‘वंचितांची उन्नती’ या विषयावर बीजभाषण होईल. दोन दिवसांतील विविध सत्रांत प्रा. सचिन मांडवगणे (कृषी कचरा पुनर्वापर), नीलेश लेले (अन्नप्रक्रिया उद्योगातून ग्रामीण आर्थिक विकास), प्रशांत देशपांडे (आत्मनिर्भर भारत), आर. एस. हिरेमठ (सामाजिक उद्योजकता), हर्षल विभांडीक (ग्रामीण उद्योजकांसाठी डिजिटल सेवा), सचिन देशपांडे (शालेय शिक्षणातले अभिनव प्रयोग), दिनकर पाटील (आदिवासीसाठी मध उद्योग) यांची मार्गदर्शन होणार आहे.

जन शिक्षण संस्थान (महिलांच्या उन्नतीसाठी कौशल्य प्रशिक्षण), कृषी विज्ञान केंद्र (शेतीतील नवीन प्रयोग), दीनदयाळ उपाध्याय कौशल्य विकास केंद्र, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ वंचित महिलांचा विकास, संस्कृतीक संवर्धन मंडळ ग्राम विकास या संस्थतर्फे सादरीकरण होणार आहे. चर्चासत्राच्या आयोजन समितीत प्र- कुलगुरू डॉ. वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर, व्यवस्थापन परिषद सदस्य काशिनाथ देवधर, डॉ. राजेंद्र तलवारे, डॉ. गजानन सानप, डीडीयुकेके संचालक डॉ. भारती गवळी, आनंद मापूस्कर, डॉ. विनय जोशी आदींचा समावेश आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

आ. सत्तार हाजीर हो, सिल्लोड न्यायालयाने काढले आदेश, निवडणुकीत मतदारांना धमकावल्याचा आरोप

Latest News

आ. सत्तार हाजीर हो, सिल्लोड न्यायालयाने काढले आदेश, निवडणुकीत मतदारांना धमकावल्याचा आरोप आ. सत्तार हाजीर हो, सिल्लोड न्यायालयाने काढले आदेश, निवडणुकीत मतदारांना धमकावल्याचा आरोप
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार पुन्हा गोत्यात येण्याची चिन्हे आहेत. विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या शेवटच्या जाहीर...
भरधाव पिकअप वाहनाने स्कुटीला उडवले, मायलेकी जखमी, छत्रपती संभाजीनगर शहराजवळील घटना
सत्यनारायण पूजेसाठी निघालेल्या पुजाऱ्याचा दुचाकी घसरून मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
झाडावरून पडून युवकाचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
शिंदे गटाला सोबत घ्यावेच लागणार, पण ‘अटींचा’ भडीमार नको म्हणून भाजपच्या खेळ्या सुरू..., शहर-जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे काय म्हणाले...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software