पावसाचा कहर तरी विद्यापीठातील युवक महोत्सवात कलेला बहर!; मुख्य भोजन मंडपावर झाड कोसळले

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाने कहर केला असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवात युवा कलावंतांच्या उत्साहाला मात्र साक्षात वरूनराजाही बांध घालू शकला नाही. कुलसचिव क्वार्टर परिसरातील मुख्य भोजन मंडपावर झाड कोसळल्याने मंडपही कोलमडून पडला होता.

तब्बल तेरा वर्षांनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा युवक महोत्सव यंदापासून जिल्हानिहाय घेण्याचे ठरले. केंद्रीय महोत्सवात पहिल्या दिवशी पावसाने हजेरी लावली, मात्र सर्व स्पर्धा वेळेत पार पडल्या. जोरदार पावसामुळे कुलसचिव क्वार्टर परिसरातील मुख्य भोजन मंडपावर झाड कोसळल्याने मंडपही कोलमडून पडला. ही माहिती मिळताच कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी रविवारी (२८ सप्टेंबर) सकाळी या ठिकाणी भेट दिली. पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या.

रविवारचा सकाळचा नाश्ता व दुपारच्या भोजनाची व्यवस्था स्वागत कक्षात करण्यात आले. हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केल्यामुळे आता रिस्क घेण्याची नाही असे ठरले. नाट्यगृहाच्या बाजूलाच नवीन भोजन मंडपाचे काम सकाळी नऊ वाजता हाती घेण्यात आले.  दुपारी एकपर्यंत हा मंडपही तयार करण्यात आला. कुलसचिव डॉ . प्रशांत अमृतकर स्वतः उभा राहून या कामकाजाचा आढावा घेत होते. कार्यकारी अभियंता रवींद्र काळे व भोजन समितीचे अध्यक्ष डॉ.भगवान साखळे यांनी उभा राहून हे काम करून घेतले. विशेष म्हणजे यंदाच्या महोत्सवाच्या भोजनाचा दर्जाही उत्तम असल्याची प्रतिक्रिया सहभागी कलावंतांनी दिली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात दर मिनिटाला वाढताहेत फ्‍लॅटच्या किंमती

Latest News

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software